दुबई : बुधवारी आशिया कपमध्ये टीम इंडियाची हाँगकाँगशी गाठ पडली. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी केली. कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात चांगली सुरुवात केली, मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही. रोहित शर्मा एक मोठा शॉट खेळायला गेला आणि आऊट झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॉंगकॉंग विरूद्धचा हा सामना पाहण्यासाठी त्याची पत्नी रितिका सजदेहही मैदानात होती. रोहित आऊट झाल्यावर तिची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली.


कर्णधार रोहित शर्मा क्रीझवर आल्यावर त्याने जलग गतीने रन्स करायला सुरुवात केली. रोहित शर्माने केवळ 13 बॉल्समध्ये 2 फोर आणि 1 सिक्ससह 21 रन्स केले. पाचव्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर रोहित शर्मा लाँग शॉट खेळायला गेला तेव्हा तो कॅच आऊट झाला.


यानंतर रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहचं रिएक्शन टीव्ही स्क्रीनवर दाखवण्यात आली. रोहित बाद झाल्यानंतर रितिका निराश दिसली आणि तिने चेहरा लपवला. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय.



टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी रितिका सजदेह अनेकदा मैदानात हजर असते. आयपीएलदरम्यानही ती रोहित शर्माला खेळताना पाहण्यासाठी सतत मैदानावर उपस्थित असते. आशिया कप सुरू झाला तेव्हा रोहित शर्माचं कुटुंब दुबईत नव्हतं, पण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर ते दुबईत आलं होतं.


भारताचा विजय


आशिया स्पर्धेत भारताने आपली विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. दुबळ्या हॉंगकॉंगचा टीम इंडियाने 40 धावांनी धुव्वा उडवला आहे. सुर्यकुमार यादव आणि विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने हॉंगकॉंगसमोर 193 धावांचं आव्हान ठेवलं होतं. 


सुर्यकुमार यादवने 26 बॉलमध्ये हे 68 धावांची तुफानी खेळी केली आहे. या खेळीत त्याने 6 सिक्स आणि 6 फोर मारले आहेत. त्याआधी रोहित शर्मा 21 आणि के एल राहूलने 36 धावा केल्या आहेत. या बळावर टीम इंडियाने 2 विकेट गमावून 192 धावा ठोकल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना हाँगकाँग टीमची दमछाक झाली.