IND vs ENG : निर्णायक सामन्यात Rohit Sharma करणार 2 मोठे बद्दल, मॅचविनर खेळाडूला देणार डच्चू
तिसऱ्या वनडेसाठी टीममध्ये 2 मोठे बदल पाहायला मिळू शकतात.
इंग्लंड : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना रविवारी होणार आहे. ही मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. मालिकेतील शेवटचा सामना निर्णायक ठरणार आहे. त्यानंतर तिसऱ्या वनडेसाठी टीममध्ये 2 मोठे बदल पाहायला मिळू शकतात. याबाबत कर्णधार रोहित शर्मा कोणते मोठे निर्णय घेणार हे आपण पाहूया.
प्रसिध कृष्णाला मिळणार डच्चू
टीम इंडियाने दोन्ही सामन्यांत गोलंदाज प्रसिध कृष्णाला संधी दिली होती, पण या दोन्ही सामन्यांमध्ये त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे तिसऱ्या वनडे सामन्यात त्याला टीमबाहेर काढू शकतात. त्याच्या जागी युवा वेगवान गोलंदाज अर्शदीपला टीममध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. किंवा मोहम्मद सिराजला रोहित शर्मा संधी देऊ शकतो.
दुसरीकडे रविंद्र जडेजा देखील गेल्या 2 सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात त्याला वगळण्यात येण्याची दाट शक्यता आहे. जडेजाच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी मिळण्याची शक्यता आहे. इंग्लंडमध्ये वेगवान गोलंदाजीसाठी वातावरण चांगलं असून शार्दुल हा फलंदाजीही करू शकतो. त्यामुळे जडेजाच्या जागी आता शार्दुलला तिसऱ्या वनडेमध्ये स्थान मिळू शकतं.
कोहलीसाठी शेवटची संधी
विराट प्रत्येक फॉरमॅटमध्ये सतत फ्लॉप होत असून कर्णधार रोहित शर्माला त्याच्याकडून खूप आशा आहेत. विराटसाठी हा सामना शेवटच्या संधीसारखा असणार आहे. सूर्यकुमार यादव पुन्हा चौथ्या क्रमांकावर येईल. त्याचवेळी पहिल्या क्रमांकावर असलेल्या ऋषभ पंत आणि इशान किशन यांच्यात चुरशीची स्पर्धा होणार आहे.
टीम इंडियाचं संभाव्य प्लेईंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी आणि युजवेंद्र चहल.