मुंबई : क्रिकेटमधील सर्वात मोठी अपडेट आहे. विराट कोहलीचं महत्त्व कमी करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व कोणाकडे जाणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. आता टीम इंडियाचं नेतृत्व जसप्रीत बुमराहकडे जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्माला कोरोनाची लागण झाल्यामुळे इंग्लंड विरुद्ध शेवटचा पाचवा कसोटी सामना तो खेळू शकत नाही. त्यामुळे टीमचं नेतृत्व कोणाकडे असणार याची चर्चा होती. विराट कोहली आणि ऋषभ पंत या दोन नावांची चर्चा होती. मात्र आता जसप्रीत बुमराहकडे ही कमान दिली जाऊ शकते. त्याचं नाव सध्या आघाडीवर आहे. 


जसप्रीत बुमराहकडे कर्णधारपद या सामन्यासाठी सोपवल्याची अधिकृत घोषणा अजून झाली नाही. भारत विरुद्ध इंग्लंड 5 कसोटी सामन्यांची सीरिज खेळवण्यात आली. त्यापैकी 4 सामने झाले. तर एक सामना कोरोनामुळे स्थगित करण्यात आला होता. तो सामना आता 1 ते 5 जुलै दरम्यान खेळवण्यात येणार आहे. 



टीम इंडिया 2-1 ने या सीरिजमध्ये आघाडीवर आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराहकडे नेतृत्व असेल तर ही सीरिज जिंकवून देण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर असणार आहे.