मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट टीम आता नव्या युगात प्रवेश करणार आहे. बुधवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माची वनडे संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली. टी-20 कर्णधारपद सोडलेला विराट कोहली आता केवळ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2021 च्या टी20 वर्ल्डकपपूर्वी विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याची चर्चा केली होती. विराटने वनडे आंतरराष्ट्रीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधारपद कायम ठेवायचं आहे, असा आग्रह धरला होता. पण बीसीसीआय मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटमध्ये दोन कर्णधार ठेवण्याच्या बाजूने नाहीत.


बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एका इंटरव्यूमध्ये याची माहिती दिली. गांगुलीने खुलासा केला की, बोर्डाने विराट कोहलीला T-20 वर्ल्डकपपूर्वी पद सोडण्याची विनंती केली नव्हती. कारण सिलेक्टर्स वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी दोन वेगळे कर्णधार ठेवण्याच्या बाजूने नव्हते.


कर्णधारपदात रोहितचा विक्रम


आता सौरव गांगुलीने रोहित शर्माला कर्णधारपदासाठी निवडण्यामागे कारणं सांगितली आहेत. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणाला की, "मर्यादित ओव्हरच्या फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून रोहितचा विक्रम मोठा आहे." 


गांगुली म्हणाला, "आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी त्याचा विक्रम अभूतपूर्व आहे...पाच विजेतेपदे जिंकण हा. त्याने काही वर्षांपूर्वी आशिया कपमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केलं होतं, जो भारतीय संघाने जिंकला होता. कोहलीशिवाय भारताने हा विजय मिळवला होता. कोहलीशिवाय जेतेपद पटकावल्याने तो संघ किती मजबूत होता हे दिसून येतं. त्यामुळेच त्याला मोठ्या स्पर्धांमध्ये यश मिळालं आहे. त्याच्याकडे चांगली टीम आहे, त्यामुळे तो संघाला पुढे नेईल अशी आशा आहे.