मुंबई : न्यूझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या टी२० सामन्यात विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी आज कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माच्या खांद्यावर देण्यात आली आहे. पण रोहित शर्मा दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला आहे. त्याच्या जागी आता केएल राहुल कर्णधाराची भूमिका पार पाडतो आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजू सॅमसन पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. तो २ रनवर आऊट झाला. राहुल आणि रोहितने 88 रनची पार्टनिरशिप करत टीमला सावरलं. राहुल ४५ रनवर आऊट झाला. 16.4 ओवरला 138/2 स्कोर असताना रोहित दुखापतीमुळे बाहेर झाला. त्याने ६० रन केले.


17 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला श्रेयसने रोहित सोबत एक रन काढला. या दरम्यान त्याच्या पायाच्या मांसपेशी ताणल्या गेल्या. ज्यामध्ये त्याला मैदानाबाहेर जावे लागले.


रोहितने ईश सोढ़ीच्या ओव्हर सिक्स ही मारले. पण रन काढता येत नसल्याने तो मैदानाबाहेर गेला. भारतीय टीम धावांचा डोंगर उभा करेल असं वाटत होतं. पण रोहित गेल्यानंतर रन कमी झाले. श्रेयस अय्यरने नाबाद 33 रन केले.


रोहित शर्माने टी-20 मध्ये आपल्या करिअरमधील २१ वं अर्धशतक ठोकलं. टी20 मध्ये सर्वाधिक 50+ करण्याच्या बाबतीत त्याने विराटला मागे टाकलं आहे. रोहितने 25 वेळा 50+ रन केले आहेत.


टी20 मध्ये सर्वाधिक 50+
25 - रोहित शर्मा
24 - विराट कोहली
17 - मार्टिन गप्टिल/ पॉल स्टर्लिंग
16 - डेविड वॉर्नर