मुंबई : न्यूझीलंडचा माजी कर्णधार रॉस टेलर (Ross Taylor)  त्याच्या 'ब्लॅक अँड व्हाइट' ऑटो बायोग्राफीवरून चर्चेत आहे. या बायोग्राफीत त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. आयपीएलमध्ये त्याला कानशिलात लगावल्याच्या प्रसंगाचा यात त्याने उल्लेख केला होता. यासोबतचं त्याने या पुस्तकात टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहूल द्रविडबाबत (Rahul Dravid)  देखील एक किस्सा सांगितला आहे. हा किस्सा एकूण अनेकांना राहूल द्रविडचा गर्व वाटतोय.  
 
रॉस टेलर (Ross Taylor)  याने 'ब्लॅक अँड व्हाइट' (Black & White) या ऑटो बायोग्राफीत राहुल द्रविड यांच्यासोबतचा एक किस्सा सांगितला आहे. ही घटना राजस्थानच्या रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातील आहे. दोघेही या उद्यानात वाघ बघायला गेले होते. या दरम्यान घडलेला एक किस्सा त्याने ऑटो बायोग्राफीत लिहला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'तो' किस्सा काय?
ऑटो बायोग्राफीत टेलर लिहतो की, 'मी द्रविडला (Rahul Dravid) विचारलं की तू किती वेळा वाघ पाहिला आहेस? द्रविडने सांगितले की, त्याने कधीही वाघ पाहिला नव्हता. तो 21 वेळा जंगल सफारीला गेला पण एकदाही त्याला वाघ दिसला नाही. यावेळी टेलरला वाटले की, 21 वेळा सफारी करूनही वाघ दिसला नाही. जर मला हे माहीत असतं तर मी गेलोच नसतो. मी द्रविडला (Rahul Dravid) सांगेन की मी डिस्कव्हरी चॅनल बघेन, असे त्याने म्हटले. 


टेलर (Ross Taylor) पुढे म्हणाला, 'जेकब ओरम सकाळी बाहेर गेला होता. त्याला सफारीला जाण्यात रस नव्हता. टीव्हीवर बेसबॉल मॅच होती ती बघायची. म्हणूनच दुपारच्या सफारीला तो आमच्यासोबत आला नाही. आमच्या ड्रायव्हरला एका कर्मचार्‍याने रेडिओ कॉलवर सांगितले की त्याने T-17 हा प्रसिद्ध वाघ पाहिला आहे. हे ऐकून द्रविडला आनंद झाला. अखेर 21 सफारीनंतर तो वाघ पाहणार होता.


“आम्ही खुल्या एसयूव्हीमध्ये होतो, जी लँड रोव्हर्सपेक्षा थोडी मोठी आहे. वाघ आमच्यापासून 100 मीटर अंतरावर एका खडकावर होता. जंगलात वाघ बघून आम्ही आश्चर्यचकीत झालो, पण इतर वाहनांमध्ये वाघ दिसण्याऐवजी लोक राहुलवर कॅमेरा लावून बसले होते. वाघाऐवजी द्रविडला पाहून ते उत्साहित होत होते. वाघ बघून आम्ही जितके उत्तेजित झालो होतो तितकेच ते राहूलला बघून उत्साही होते. जगात 4000 वाघ आहेत, पण राहुल द्रविड हा एकच असल्याची स्तुतिसुमने त्याने या किस्स्याच्या शेवटी उधळली आहेत.  


रॉस टेलर (Ross Taylor) यांच्या आत्मचरित्राचे गुरुवारी प्रकाशन करण्यात आले. त्याच्या आत्मचरित्रात, टेलरने वर्णद्वेषाचा सामना करण्यासह राजस्थान रॉयल्सच्या मालकाने थप्पड मारल्या सारख्या अनेक घटनांचे धक्कादायक खुलासे केले आहेत.