Play off सामन्यापूर्वी RCB च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; `हा` विस्फोटक खेळाडू मैदानात उतरणार
आयपीएल आता अंतिम टप्प्यात पोहोचलीय. आजपासून प्लेऑफ सामने सुरु होणार असून सर्वच संघ सज्ज झाले आहेत.
मुंबई : आयपीएल आता अंतिम टप्प्यात पोहोचलीय. आजपासून प्लेऑफ सामने सुरु होणार असून सर्वच संघ सज्ज झाले आहेत. आज गुजरात आणि राजस्थानमध्ये सामने होणार आहेत तर उद्या लखनऊ आणि आरसीबी भिडणार आहे. आरसीबीच्या या सामन्यापूर्वी मोठी खुशखबर मिळाली आहे. आरसीबीच्या संघात विस्फोटक फलंदाज दाखल होणार आहे. हा फलंदाज आरसीबीला आयपील जिंकवण्यात मदत करू शकतो, असा दावा होतोय.
आयपीएल 2022 च्या ट्रॉफीपासून आरसीबी 3 सामने दूर आहे. त्यात बंगळुरूच्या चाहत्यांसाठी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. बंगळुरूच्या सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक असलेल्या एबी डिव्हिलियर्स आयपीएलच्या मैदानात उतरणार आहे. आयपीएल 2023 मध्ये तो पुनरागमन करणार असल्याचे संकेत एबी डिव्हिलियर्सने दिले आहेत.
एबी डिव्हिलियर्स VUSport मुलाखतीत म्हणाला, 'प्रामाणिकपणे सांगायचे तर मी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. पण मी पुढच्या वर्षी आयपीएलच्या आसपास असेल. तिथे किती क्षमता असेल याची खात्री नाही, पण मी तिथे असेन. मला माझ्या दुसऱ्या घरी (बंगलोर) परतायला आणि चिन्नास्वामीच्या खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये सामना पाहायला आवडेल.त्याच्या विधानावर तो मैदानात पुनरागमन करण्याची चर्चा सुरु झालीय.
डिव्हिलियर्सची कामगिरी
एबी डिव्हिलियर्सने आरसीबीकडून एकूण 157 सामने खेळले आहेत. एबी डिव्हिलियर्स खेळाडू म्हणून 11 वर्षांपासून बंगळुरूसोबत आहे. या सामन्यांमध्ये त्याने 2 शतके आणि 37 अर्धशतकांच्या मदतीने 4522 धावा केल्या आहेत. आरसीबीसाठी सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.
प्लेऑफचे सामने
क्वालिफायर 1: 24 मे- गुजरात टाइटंस vs राजस्थान रॉयल्स, कोलकाता
एलिमिनेटर: 25 मे, लखनऊ सुपर जायंट्स vs रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु, कोलकाता
क्वालिफायर 2: 27 मे, एलिमिनेटर विजेता vs क्वालिफायर-1 पराभूत टीम, अहमदाबाद