मुंबई  : IPL 2022 चा एलिमिनेटर सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि लखनऊ सुपर जायंट्समध्ये खेळला जातोय. या सामन्यात आरसीबीना 207 धावा केल्या आहेत. रजत पाटीदारने शतक झळकावत 112 धावांची मोठी खेळी केली. दिनेश कार्तिकने 37 तर विराटने 25 धावा केल्या. विराटने निव्वळ 25 धावा करूनही फार मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लखनऊने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरूचा फलंदाज विराट कोहलीने या सामन्यात छोटी खेळी खेळली, पण वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. विराटने 25 बॉलमध्ये 25 रन्स केले. या धावा करून त्याने ऑस्ट्रेलियाचा टी-20 कर्णधार आरोन फिंचला मागे टाकले आहे.


विराट पराक्रम
विराट कोहलीने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 25 चेंडूत 25 धावा केल्या. या डावात टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत त्याने अॅरॉन फिंचला मागे टाकले आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. आरोन फिंचच्या टी-20 क्रिकेटमध्ये 10585 धावा आहेत, विराटने आता 10607 धावा करत अॅरोन फिंचला मागे टाकले आहे.


T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत 4 खेळाडू अजूनही विराट कोहलीच्या पुढे आहेत. या यादीत वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल आघाडीवर आहे. ख्रिस गेलने T20 क्रिकेटच्या 463 सामन्यांमध्ये 22 शतके आणि 88 अर्धशतकांच्या मदतीने 14562 धावा केल्या आहेत. ख्रिस गेलनंतर पाकिस्तानचा शोएब मलिक, वेस्ट इंडिजचा खेळाडू किरॉन पोलार्ड आणि ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नर यांचे नाव या यादीत आहे.