KKR vs RR: मॅचमध्ये कॅप्टन श्रेयस अय्यर व्यंकटेशवर संतापला, पाहा व्हिडीओ
रन काढताना कॅप्टन श्रेयस अय्यरने व्यंकटेशला झापलं, संतापलेल्या कॅप्टनचा व्हिडीओ व्हायरल
मुंबई : राजस्थान विरुद्ध कोलकाता आयपीएलमधील 30 वा सामना नुकताच झाला. आयपीएलमधील कोलकाताचा हा 150 वा सामना होता. राजस्थाननं कोलकाताला 7 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात राजस्थाननं 218 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र कोलकाता ते पूर्ण करू शकला नाही.
या मॅचमध्ये कॅप्टन श्रेयस अय्यर रन काढताना व्यंकटेश अय्यरवर चांगलाच संतापला होता. तो मैदानात व्यंकटेशला झापतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
16 व्या ओव्हरमध्ये ट्रेंट बोल्ट बॉलिंग करत होता. यावेळी व्यंकटेशनने डीप बॅकवर्ड पॉईंट शॉर्ट खेळला. श्रेयस अय्यरला दोन रन काढायचे होते. मात्र व्यंकटेशनं दुसरी धाव काढण्यासाठी नकार दिला. त्यावेळी श्रेयस अय्यरला राग आला आणि तो त्याच्यावर ओरडला.
व्यंकटेश अय्यर कर्णधार श्रेयस ओरडतोय ते शांतपणे ऐकत असल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. राजस्थान टीमने कोलकाताचा 7 धावांनी पराभव केला.
श्रेयस अय्यरने 51 बॉलमध्ये 7 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं 85 धावांची खेळी केली. युजवेंद्र चहलने 4 ओव्हरमध्ये 5 फलंदाजांना तंबुत धाडलं. त्यामुळे कोलकाता टीमचं मोठं नुकसान झालं.