RR vs MI : जयस्वालचा मुंबईला तडाखा! सातव्या विजयासह रचला `हा` रेकॉर्ड
IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 38 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना मुंबई इंडिन्यविरूद्ध झाला, या सामन्यात यशस्वी जयस्वालच्या नाबाद शतकीय खेळीमुळे राजस्थानने, मुंबई इंडियन्सचा 9 धावांनी धुव्वा उडवला आणि या विजयासोबत राजस्ठानच्या संघाने अनेक अनोखे रेकॉर्डही आपल्या नावावर केले आहेत.
Yashsvi Jaiswal Century : राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स या दोघं संघात झालेल्या आयपीएलच्या 38 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सला 9 विकेट्सने पराभूत करून राजस्थान रॉयल्सने 2 महत्वपूर्ण पॉइंट्स आपल्या नावावर केले आहेत. या विजयासोबतच राजस्थानच्या टीमने प्लेऑफमध्ये क्वॉलिफाय करण्यासाठी एक पाऊल पूढे टाकलंय. या सामन्यात राजस्थानकडून दोन खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली, पहिले गोलंदाजीत संदीप शर्माने आपल्या चार ओव्हरमध्ये मुंबईच्या गोलंदाजांना धाराशाही करत पाच विकेट्स घेतल्या, त्यानंतर फलंदाजीत यशस्वी जयस्वालने नाबाद 104 धावा करत मुंबईच्या संघाला बॅकफूटवर टाकलं होतं. यशस्वी जयस्वालच्या शतकीय इनिंगमध्ये 9 चौके आणि 7 षटकार समाविष्ट होते आणि यामुळे राजस्थान रॉयल्सने 180 धावांचे आव्हान फक्त 18.4 ओव्हरमध्येच पार केले. राजस्थानकडून फलंदाजीत संजू सॅमसनने पण नाबाद 38 धावा केल्यात, तर जॉस बटलरनेही आपले मौल्यवान योगदान देत 25 बॉलमध्ये 35 धावा केल्या होत्या.
राजस्थानच्या जयस्वालने केला रेकॉर्ड
मुंबईविरूद्ध शतक झळकावत यशस्वी जयस्वालने 22 वर्षाच्या वयात आयपीएलमध्ये एक ऐतिहसिक रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय. या शतकासोबत यशस्वी हा 23 वर्ष वयाच्या आधी आयपीएलमध्ये दोन शतक ठोकणारा पहिला खेळाडू बनला आहे. यशस्वी जयस्वालने या आधी आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सविरूद्धच, वानखेडे स्टेडियममध्ये 21 वर्ष 123 दिवसांच्या वयात नाबाद 124 धावांची ताबडताब शतकीय खेळी खेळली होती, तर आता 22 वर्ष 116 दिवसांच्या वयात त्याने दुसरे शतक झळकावले आहे.
एका संघाविरूद्ध सर्वात जास्त शतक
मुंबई इंडियन्सविरुद्ध यशस्वीने आपल्या आयपीएल करिअरमधील दुसरं शतक लगावले, तर यशस्वीच्या या कारणाम्यामुळे, एका संघाविरूद्ध दोन शतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या लिस्टमध्ये जयस्वालचे नाव जोडलं गेलं आहे. या लिस्टमध्ये के एल राहूल हा प्रथम स्थानावर असून, त्याने मुंबई इंडियन्सविरूद्ध 3 शतक ठोकले आहेत, तर क्रिस गेलने पंजाब किंग्सविरूद्ध 2, विराट कोहलीने गुजरात टायटन्सविरूद्ध 2, डेविड वॉर्नरने केकेआरविरूद्ध 2, तर जॉस बटलरने केकेआर आणि आरसीबी या दोघं संघांविरूद्ध प्रत्येकी 2 शतक मारले आहे. आता या लिस्टमध्ये यशस्वी जयस्वालचे नाव पण जोडलं गेलंय, यशस्वीने मुंबई इंडियन्सविरूद्ध 2 शतक करण्याचा रेकॉर्ड आता आपल्या नावावर केला आहे.
राजस्थान रॉयल्सचा 8 सामन्यात सातवा विजय
राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2024 मध्ये ऐतिहासिक प्रदर्शनासोबत सुरूवात केलीये. राजस्थानच्या संघाने या सिजनमध्ये सुरूवातीच्या 8 सामन्यात, चक्क 7 सामने जिंकलेले आहेत आणि या प्रकारची कामगिरी करणारी राजस्थान आयपीएलच्या इतिहासातील पाचवी टीम बनली आहे. या आधी मुंबई इंडियन्सने 2010 मध्ये, पंजाब किंग्सने 2014, सीएसकेच्या संघाने 2019, तर गुजरात टायटन्सने 2022 मध्ये ही अनोखी कामगिरी केली आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे फक्त गुजरात टायटन्सचा संघ यामधून आयपीएल 2022 मध्ये विजेता बनला होता. तर आता पूढील सामन्यात राजस्थानचा संघ कशाप्रकारची कामगिरी करणार आणि किती सामन्यात आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये आपली जागा पक्की करणार यावर साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.