Live match मध्ये फॅन्सचा गोंधळ; नाझी सलाम करत Queen Elizabeth II च्या निधनावरही केली कमेंट
स्टँडवरून, चाहत्यांनी हुल्लडबाजी केली आणि नाझी सलामी दिली.
जर्मन : मंगळवारी चॅम्पियन्स लीगमध्ये बराच गदारोळ झालेला दिसून आला. मैदानातील खेळापासून चाहत्यांच्या वागणुकीपर्यंत बरेच वाद यावेळी निर्माण झाले. फ्रँकफर्टमधील Marseille आणि Eintracht Frankfurt यांच्यातील सामन्यात चाहत्यांनी नाझी सॅल्यूट करण्यास सुरुवात केल्याने वाद झाला आणि स्टँडवरील परिस्थिती अवाक्याबाहेर गेली.
स्टँडवरून, चाहत्यांनी हुल्लडबाजी केली आणि नाझी सलामी दिली. यावेळी काही चाहत्यांनी Eintracht Frankfurt क्लबचे कपडे घातले होते. ज्यानंतर क्लबने माफी मागितली आणि स्पष्टीकरण दिलंय. क्लबचं म्हणणं आहे की, ते अशा चाहत्यांशी संबंध ठेवत नाही आणि या प्रकरणी कायदेशीर कारवाईला पूर्ण पाठिंबा देतील.
चॅम्पियन्स लीग दरम्यान अलीकडच्या काही सामन्यांमध्ये अशा प्रकारचा निषेध दिसला होता, त्यानंतर बराच गदारोळ झाला होता.
याशिवाय आणखी एका सामन्यातही एक वादग्रस्त पोस्टर पाहायला मिळाले. जर्मनीतील बायर्न म्युनिक-बार्सिलोना सामन्यादरम्यान काही चाहत्यांनी ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनामुळे रद्द झालेल्या सामन्यांचा निषेध केला. चाहते मोठमोठे बॅनर घेऊन पोहोचले होते. यावेळी राजेशाहीच्या मृत्यूमुळे सामने रद्द करू नयेत, असं लिहिलं होतं.
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ब्रिटनमधील क्रीडा स्पर्धा एक दिवसासाठी पुढे ढकलण्यात आली होती, याशिवाय युरोपातील काही देशांनीही आदरांजली वाहिली होती. यानंतर इंग्लंड सरकारकडून असं आवाहन करण्यात आलं की, खेळाडूंना केवळ काळ्या हातपट्ट्या घालून शोक व्यक्त करता येईल.