ऋतुराज गायकवाडचं ठरलं! जूनमध्ये अडकणार विवाहबंधनात; पण कोण आहे ती तरुणी?
Ruturaj Gaikwad Marriage: ऋतुराज गायकवाड लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. येत्या जुनमध्ये तो लग्न करणार आहे.
Ruturaj Gaikwad Wedding: आयपीएलच्या १६ व्या हंगामातील अंतिम सामना आज रंगणार (IPL Final) आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स असा सामना (CSK Vs GT) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममवर रंगणार आहे. त्यापूर्वीच भारतीय संघाचा फलंदाज आणि चेन्नईचा स्टार खेळाडू ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. ऋतुराज गायकवाड लवकरच बोहल्यावर चढणार आहे. येत्या जुनमध्ये तो लग्नगाठ बांधणार असल्याचं बोललं जात आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपला मुकणार
ऋतुराज गायकवाड आयपीएलच्या सामन्यानंतर आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलआधी लग्न करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळंच त्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशनशिपला मुकावे लागणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशनशिपच्या फायनलसाठी निवडण्यात आलेल्या टीममध्येही त्यानुसार मोठा बदल करण्यात आला आहे. आता ऋतुराजच्या बदली टीम इंडियामध्ये यशस्वी जयस्वालची निवड करण्यात येणार आहे. येत्या ३ ते चार जूनदरम्यान ऋतुराज लग्नबंधनात अडकणार आहे.
बीसीसीआयकडे मागितला होता वेळ
ऋतुराजने बीसीसीआयकडे ५ जूनपर्यंत संघात सहभागी होण्याचा वेळ मागितला होता. मात्र, बीसीसीआयने त्याला नकार दिला आहे. टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी ऋतुराजच्या जागी बदली खेळाडूची मागणी केली. त्यानुसार ऋतुराजच्या जागी यशस्वी जयस्वालची निवड केली जाणार आहे, बीसीसीआयने तसी माहिती दिली आहे.
कोण आहे ऋतुराजची होणारी पत्नी
३ ते ४ जूनदरम्यान ऋतुराज लग्न करणार असल्याची चर्चा आहे. तो गर्लफ्रेंड उत्कर्षासोबत लग्न करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. दोघेही एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत असून ते अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी उत्कर्षाने ऋतुराजसोबतचा जिम सेक्शनमधील एक फोटो पोस्ट केला होता. हाच फोटो सध्या व्हायरल होत आहे. दरम्यान, ऋतुराज तेजश्रीसोबतच लग्न करणार आहे का? हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सायली संजीवसोबत जोडलं होतं नाव
ऋतुराजचे याआधी मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवसोबत नाव जोडले गेले होते. अनेकदा मुलाखतीतही त्यांना याबाबत प्रश्न विचारले होते. मात्र दोघांनीही त्या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले होते. आम्ही फक्त मित्र आहोत, असं दोघांनीही म्हटलं होतं. एका मुलाखतीत सायलीने, आम्ही दोघे मित्र होतो. पण या सर्व चर्चांमुळं बोलणंही बंद झालंय. ऋतुराज दुसऱ्याशी लग्न होईल तेव्हाच या चर्चा बंद होतील, असं सायलीने म्हटलं होतं.