Ruturaj Gaikwad : ऋतुराजच्या पत्नीला धोनीकडून जादू की झप्पी; व्हिडीओ होतोय व्हायरल
Ruturaj Gaikwad : आयपीएल फायनल सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगला होता. चेन्नईचा ( Chennai Super Kings ) विजय झाल्यानंतर उत्कर्षाचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय.
Ruturaj Gaikwad : आयपीएल ( IPL 2023 ) नुकतीच संपली असून चेन्नई सुपर किंग्जने यंदाची स्पर्धा जिंकली आहे. फायनल सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ) विरूद्ध गुजरात टायटन्स ( Gujrat Titans ) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात अगदी शेवटच्या बॉलवर चेन्नईने ( Chennai Super Kings ) बाजी मारली. दरम्यान हा सामना संपल्यानंतर काही खेळाडूंचं कुटुंब मैदानात उतरलेलं दिसलं. यामध्ये ऋतुराज गायकवाडची ( Ruturaj Gaikwad ) होणारी बायको उत्कर्षा देखील होती. चेन्नईचा ( Chennai Super Kings ) विजय झाल्यानंतर उत्कर्षाचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय.
ऋतुराज गायकवाडचा ( Ruturaj Gaikwad ) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या टीमसाठी नाव देण्यात आलं होतं. मात्र गायकवाडचं लग्न असल्याने त्याने WTC मधून आपलं नाव मागे घेतलं. ऋतुराज ( Ruturaj Gaikwad ) उत्कर्षा पवारसोबत ( Utkarsha Pawar ) लग्नगाठ बांधणार आहे. दरम्यान आयपीएलची फायनल संपल्यानंतर उत्कर्षाने चेन्नईच्या ( Chennai Super Kings ) टीमचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीसोबत असं काही केलं की, त्याचा फोटो आता सोशल मीडियवर व्हायरल होतोय.
उत्कर्षाने धोनीचा घेतला आशीर्वाद
चेन्नई सुपर किंग्जचा ( Chennai Super Kings ) फलंदाज ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. 3 जून रोजी दोघं लग्न गाठ बांधणार आहेत. आयपीएलचा फायनल सामना पाहण्यासाठी उत्कर्षा ( Utkarsha Pawar ) स्टेडियममध्ये आली होती. यावेळी चेन्नईचा विजय झाल्यानंतर सर्व खेळाडूंचे कुटुंबीय एकमेकांची भेट घेत होते.
यावेळी ऋतुराज गायकवाडची भावी पत्नी उत्कर्षा ( Utkarsha Pawar ) एमएस धोनीला भेटायला गेली. यावेळी तिच्या सोबत ऋतुराजही होता. असं असताना उत्कर्षा ( Utkarsha Pawar ) महेंद्रसिंग धोनीचे आशीर्वाद घेण्यासाठी पाया पडताना दिसली यावेळी धोनीनेही तिला मिठी मारलीये. ऋतुराज गायकवाडची पत्नी उत्कर्षा हिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतोय.
कोण आहे उत्कर्षा पवार?
उत्कर्षा ( Utkarsha Pawar ) एक प्रोफेशनल क्रिकेटपटू आहे. 23 वर्षीय उत्कर्षा पुण्याची राहणारी आहे. ती महाराष्ट्र महिला क्रिकेट टीमकडून खेळते. 2012-13 आणि 2017-18 च्या सिझनच्या महाराष्ट्राच्या अंडर-19 टीममध्ये सहभागी झाली होती. त्यानंतर उत्कर्षाची महाराष्ट्राच्या सिनियर टीममध्येही निवड झाली. फलंदाजीसोबत उत्कर्षा गोलंदाजी देखील करते.