आफ्रिका विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी आज टीम इंडियाच्या घोषणेची शक्यता
आयपीएलच्या 15 व्या मोसमानंतर (IPL 2022) दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर (South Africa Tour Of India 2022) येणार आहे.
मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमानंतर (IPL 2022) दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर (South Africa Tour Of India 2022) येणार आहे. या दौऱ्यात आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया (Team India) यांच्यात 5 सामन्यांची टी 20 सीरिज होणार आहे. या टी 20 मालिकेसाठी आणि इंग्ंलंड विरुद्धच्या उर्वरित एकमेव कसोटीसाठी टीम इंडियाचा आज (22 मे) संघ जाहीर केला जाऊ शकतो. या सीरिजमध्ये युवा खेळाडूंना संधी मिळण्याती शक्यता आहे. (sa tour of india 2022 bcci will today 22 may announced team india squad against south africa t20i series dinesh karthik may be comeback)
नेतृत्वाची जबाबदारी कोणाकडे?
आफ्रिका विरुद्धच्या या मालिकेत टीम इंडियामध्ये मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. रोहित शर्मासह, रिषभ पंत आणि जसप्रीत बुमराह या मुख्य खेळाडूंना या सीरिजसाठी विश्रांती मिळू शकते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून टीममधून बाहेर असलेल्या हार्दिक पंड्याला किंवा शिखर धवनला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात येऊ शकते.
युवा खेळाडूंना संधी
तसेच आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या काही मोजक्या खेळाडूंना संधी मिळू शकते. यामध्ये टिळक वर्मा, राहुल त्रिपाठी आणि उमरान मलिक या युवा खेळाडूंच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
डीके बॉस परतणार?
दिनेश कार्तिकला या सीरिजमध्ये संधी दिली जाऊ शकते. डीकेने आयपीएलच्या 15 व्या मोसमात बॅटिंगसह शानदार विकेटकिपिंग केली. यासह डीकेने आपली दावेदारी सिद्ध केलीय.
डीके टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलिया विरुद्ध 27 फेब्रुवारी 2019 ला अखेरचा टी 20 सामना खेळला होता. टीम मॅनेजमेंटने डीकेला संधी दिल्यास त्याचं तब्बल 3 वर्षांनंतर संघात पुनरागमन होईल.
दरम्यान दक्षिण आफ्रिकेने या टी 20 सीरिजसाठी आधीच संघ जाहीर केला आहे. टेम्बा बावूमाच्या नेतृत्वात आफ्रिका टीम इंडिया विरुद्ध भिडणार आहे. तर 5 वर्षांनी वेन पार्नेलचं संघात पुनरागमन झालंय.
तर दुसऱ्या बाजूला आता निवड समिती काय निर्णय घेते आणि टीम इंडियात कोणाला संधी देते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. टी 20 सीरिजला 9 जूनपासून सुरुवात होणार आहे.
टी 20 मालिकेचं वेळापत्रक
मॅच तारीख ठिकाण
पहिला सामना 9 जून दिल्ली
दुसरा सामना 12 जून कटक
तिसरी मॅच 14 जून वायझॅग
चौथा सामना 17 जून राजकोट
पाचवी मॅच 19 जून बंगळुरु
टी20 सीरीजसाठी दक्षिण आफ्रिका टीम
टेम्बा बावुमा (कॅप्टन), क्वींटन डी कॉक, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेविड मिलर, लुंगी एन्गिडी, एनरिक नोर्टजे, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रस्सी वॅन डेर डूसन आणि मार्को जेन्सन.