मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या बालपणीच्या मित्राचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोवर लाखो लाईक्सचा पाऊस पडतोय. सचिनचा क्रिकेटमधील एकमेव मित्र विनोद कांबळी तुम्हाला माहित असेल, पण सचिनने आणखी एका मित्राचा फोटो शेअर केला आहे. 


या मित्राचं नाव अतुल रानडे आहे, अतुल रानडे सचिनच्या साहित्य सहवासमध्ये राहत होता, सचिनपेक्षा तो एक वर्ष मोठा आहे. सचिनसारखंच त्यानेही रमाकांत आचरेकर यांच्याकडून क्रिकेटचे धडे घेतले होते. मात्र अतुल रानडेचं करिअर क्रिकेटमध्ये होवू शकलं नाही.मात्र सचिन हा फोटो शेअर करताना म्हणतो, आम्ही तेव्हाही मित्र होतो आणि आताही मित्र आहोत.