नवी दिल्ली : क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या नावावर अनेक रेकॉर्ड्सची नोंद केली आहे. यापैकी एक रेकॉर्ड बनला तो म्हणजे २० नोव्हेंबर रोजी...


२० नोव्हेंबरला बनला रेकॉर्ड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या २४ वर्षांच्या क्रिकेटच्या कारकिर्दीत सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ३४,३५७ रन्स केले. २० नोव्हेंबर २००९ रोजी अहमदाबादमध्ये श्रीलंकेविरोधात खेळताना सचिनने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३० हजार रन्सचं शिखर सर केलं.


३० हजार रन्सचा टप्पा गाठण्यासाठी सचिन तेंडुलकरला ३५ रन्सची आवश्यकता होती. श्रीलंकेविरोधात खेळलेल्या या टेस्ट मॅचमध्ये सचिन तेंडुलकरने ३५ रन्स केले आणि ३० हजार रन्स पूर्ण केले. वन-डे, टेस्ट मॅचेसमध्ये मिळून ३० हजार रन्सचा टप्पा सचिनने पार केला.


मॅचच्या शेवटच्या दिवशी पूर्ण केला रेकॉर्ड


श्रीलंकेविरोधात खेळण्यात आलेल्या टेस्ट मॅचच्या सीरिजची ही पहिलीच मॅच होती. टेस्ट मॅचच्या शेवटच्या दिवशी सचिन तेंडुलकरने हा रेकॉर्ड पूर्ण केला.


असं गाठलं ३० हजार रन्सचं शिखर


शेवटच्या दिवशी ४४वी ओव्हर चनाका वेलेगेदेरा टाकत होता. त्याच्या एका बॉलमध्ये सचिनने डीप स्क्वेअर लेग खेळत आपला ३५ वा रन बनवला. यासोबतच ३० हजार रन्सचं शिखर गाठणारा सचिन तेंडुलकर पहिला बॅट्समन ठरला.


आंतरराष्ट्रीय करिअरमधील ८८वी सेंच्युरी


मात्र, केवळ ३५ रन्स केल्यावर सचिन थांबला नाही तर या मॅचमध्ये त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरमधील ८८वी सेंच्युरीही लगावली. ही सेंच्युरी सचिनच्या टेस्ट करिअरमधील ४३वी सेंच्युरी होती. ही मॅच ड्रॉ झाली मात्र, सचिनने केलेल्या या विक्रमामुळे ही मॅच सर्वांसाठी खास ठरली.