मुंबई : सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर आणि भारतीय फलंदाज शुभमन गिल दोघेही त्यांच्यामधील नात्याच्या अफवांमुळे नेहमीच चर्चेत असतात. दोन्ही स्टार्स सोशल मीडियावरही खूप सक्रिय दिसतात. ते वेगवेगळे फोटो शेअर करुन आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. हल्लीच शुभमन गिलने मंगळवारी संध्याकाळी भारतीय महिला संघाचा जयजयकार करणारा व्हिडीओ शेअर केला. त्याच वेळी, साराने देखील तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये बऱ्याच काळानंतर तिचा नवीन लूक दाखवला. ज्यामुळे त्यांना मेड फॉर इच अदर असे लोक म्हणू लागले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दोघांची पोस्ट एकाच दिवशी पडल्यामुळे पापाराझींना चर्चेसाठी नवीन विषय मिळाला आहे. परंतु हे लक्षात घ्या की, या दोघांनी एकाच दिवशी पोस्ट केले असले तरी, त्यांच्या पोस्टचा किंवा त्याच्या कॅप्शनचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.


साराने तिचा फोटो इंस्टा स्टोरीमध्ये पोस्ट करत लिहिले की, 'कधीही वाटले नव्हते की मला हे सांगावे लागेल पण…' त्यानंतर पुढील स्टोरीमध्ये साराने एक व्हिडीओ टाकला.



सारा तेंडुलकरच्या पुढच्या स्टेरीमध्ये लंडनच्या रस्त्यांचे दृश्य होते. या व्हिडीओमध्ये तिने लिहिले की, '3 वर्षांनंतर हिवाळ्यात लंडनला परतणे खूप आनंददायी आहे.' सारा गेल्या काही दिवसांपासून भारतात होती. नुकतेच तिचे अनेक फोटो समोर आले आहेत, ज्यात ती गोव्यात सुट्टी घालवताना दिसत आहे. त्यानंतर आता ती लंडनमध्ये परतली आहे.


मुंबईत ती पंजाबी गायक एपी धिल्लॉनच्या कॉन्सर्टमध्ये मस्ती करताना दिसली. याशिवाय हैदराबादमध्ये टायगर श्रॉफ आणि त्याच्या बहिणीने आयोजित केलेल्या फायटिंग इव्हेंटचाही आनंद घेताना सारा दिसली होती.


साराने काही दिवसांपूर्वी मॉडेलिंगच्या जगातही प्रवेश केला होता. तानिया श्रॉफ आणि बनिता संधूसोबतचा त्याचा एक जाहिरात व्हिडिओ समोर आला आहे.


शुभमन गिलनेही ही गोष्ट लिहिली


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दुसरीकडे, मंगळवारी संध्याकाळी साराच्या पोस्टच्या काही मिनिटे आधी, शुभमन गिलने देखील इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला. त्याच्या व्हिडीओमध्ये, त्याने न्यूझीलंड दौर्‍याच्या आधीच भारतीय महिला संघाचा जयजयकार केला. याला पोस्ट करताना लिहिले की,'व्हाईट फर्न्ससोबतच्या सामनादरम्यान निळ्या जर्सीतील महिलांना पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही.'