मुंबई : क्रिकेटर, मास्टर ब्लास्टर आणि भारतरत्न अशी ओळख असणाऱ्य़ा सचिन तेंडुलकर याच्या मुलीनं सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. लाखोंच्या संख्येत साराचे फॉलोअर्स आहेत. तिच्या प्रत्येक पोस्टनं तितकीच मोठी चर्चाही होऊ लागली आहे. (sara tendulkar, Arjun tendulkar, sachin tendulkar)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साराच्या एकंदर पोस्ट पाहता ती कला जगतात पदार्पण करणार का, असेही प्रश्न अनेकांनीच उपस्थित केले. ज्यात भर टाकली ती म्हणजे एका क्रिकेटपटूशी जोडल्या गेलेल्या तिच्या नावानं. 


इथं आयपीएलच्या नव्या पर्वासाठी खेळाडूंवर बोली लागत असतानासुद्धा सारा कोणाला पाठींबा देते आणि कोणात्या यशानं आनंदी होते, यावरही फॉलोअर्सचं लक्ष होतं. 


अखेर तो क्षण आलाच, जेव्हा सारानं एका खेळाडूची मुंबईच्या संघात निवड झाल्यामुळं त्याला शुभेच्छा दिल्या. 


ठिकठिकाणी या खेळाडूचं होणारं कौतुक पाहून, त्याचा फोटो असणारं एक पोस्टर तिनं इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केलं होतं. 


मुंबईच्या संघातील हा खेळाड़ू ठरला खुद्द साराचाच सख्खा भाऊ, अर्जुन तेंडुलकर. 2008 पासून मुंबईच्या संघाचा चाहता असणारा हाच अर्जुन आता संघाचा एक भाग आहे. 



सारानं शेअर केलेल्या पोस्टरमध्ये अर्जुनचा मोठा फोटो, त्याच्यावर बोली लागलेला 30 लाख रुपयांचा आकडा असं एकंदर चित्र होतं. तेंडुलकर कुटुंबासाठी अर्थातच ही बाब सुखावणारी असणार यात शंका नाही. 


त्यातही सचिन तेंडुलकर याचा मुलगा असल्यामुलं क्रीडारसिकांच्या त्याच्याकडून काही अपेक्षाही आहेत. आता तो या अपेक्षा आणि बहिणीला वाटणारा अभिमान सार्थ ठरवतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.