Shubman Gill Century : गेल्या 11 महिन्यापासून फॉर्मशी झुंज देत असलेल्या शुभमन गिलने भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात (IND vs ENG 2nd Test) शतक ठोकत टीम इंडियामधील स्थान निश्चित केलं आहे. 147 चेंडूत 11 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने शुभमन गिलने झुंजावती खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाला दुसऱ्या डावात 255 धावा करता आल्या आहेत. कसोटी सामन्यात गेल्या 7 वर्षात चेतेश्वर पुजारानंतर क्रमांक तीनवर खेळणाऱ्या एकाही फलंदाजाला शतक ठोकता आलं नव्हतं. त्यानंतर आता शुभमन गिलने अशी किमया करून दाखवली आहे. अशातच आता सचिन तेंडूलकरने शुभमन गिलचं तोंडभरून कौतूक केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यावर सचिन तेंडूलकर सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे. अशातच सचिनने शुभमन गिलच्या शतकावर एक्सवर पोस्ट करत त्याचं तोंडभरून कौतूक केलंय. शुभमन गिलची ही खेळी कौशल्याने परिपूर्ण होती. 100 पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन, असं सचिन तेंडूलकरने पोस्ट करत म्हटलं आहे.



सचिन तेंडूलकरने बुमराहच्या कामगिरीचं देखील कौतूक केलंय. बुमराह मजा आ गया, असं सचिन म्हणतो. तसेच त्याने यशस्वी जयस्वालच्या उल्लेखनीय कामगिरीचं देखील कौतूक केलंय. यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल यांनी तिसऱ्या कसोटीत शतकी खेळी केली आणि वयाच्या पंचवीशीच्या आत एकाच कसोटीत शतक झळकावणारी ही भारताची दुसरी जोडी ठरली. त्याआधी 1996 मध्ये नॉटींगहॅम येथे सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी इंग्लंडविरुद्ध असाच पराक्रम केला होता.



इंग्लंडची प्लेइंग 11: जॅक क्राउली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर, जेम्स अँडरसन.


भारताची प्लेइंग 11: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह.