सचिन तेंंडुलकरने ट्विटरकडे केली `ही` तातडीची मागणी
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर खूपच अॅक्टीव्ह झाला आहे.
मुंबई : क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर खूपच अॅक्टीव्ह झाला आहे.
समाजात घडणार्या अनेक लहान मोठ्या गोष्टींवर तो भाष्य करतो, वैयक्तिक आयुष्यातील काही क्षण फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करतो. मुलांबाबतही सचिन खूप प्रोटेक्टीव्ह आहे.
काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकरच्या दोन्ही मुलांबाबचे काही फेक फोटो सोशल मीडियामध्ये फिरत होते. सोबतच सारा आणि अर्जुन तेंडुलकरची काही फेक अकाऊंटही बनवण्यात आली आहे.
फेक अकाऊंटचा प्रकार निदर्शनात आल्यानंतर सचिननेही ट्विटरवरून ही अकाऊंट बंद करण्याचा तसेच या प्रकारावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सारा आणि अर्जुन तेंडूलकर ट्विटर नसून त्यांच्या नावाने उघडलेली अकाऊंट्स खोटी असल्याचे सचिननने स्पष्ट केले आहे.
सारा तेंडुलकर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले होते. मात्र तेंडुलकर कुटुंबियांकडून कोणीही याबाबत अधिकृत वक्तव्य केलेले नाही. तसेच अर्जुन तेंडुलकरही सध्या क्रिकेटविश्वामध्ये पदार्पण करत आहे. अर्जुनची अंडर १९ साठी निवड झाली आहे.