Sachin Tendulkar: राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गटामध्ये (Shinde Group) पक्षाच्या नावावरुन आणि चिन्हावरुन संघर्ष सुरु आहे. ठाकरे गटाकडून त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल या तीन चिन्हांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला होता. यापैकी ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आलं आहे.तर शिंदे गटाकडून  त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा चिन्हांचा पर्याय देण्यात आला होता. त्यामुळे शिंदे गटाने सूर्याचा पर्याय दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तरदुसरीकडे क्रिकेटचा देव (God of Cricket) सचिन तेंडुलकरही सुर्याच्या (Sun) प्रेमात पडलेला दिसतं आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सचिन तेंडुलकर आपला बहुतांश वेळ गोल्फ मैदानावर घालवतो. क्रिकेट आणि टेनिसप्रमाणेच सचिनला गोल्फही (Golf) खूप आवडतो. तो अनेकदा गोल्फ मैदानावरील फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करतो, परंतु यावेळी सचिन कदाचित मजेदार मूडमध्ये होता. (sachin tendulkar shares Sun Photos nmp)


सचिन तेंडुलकर हनुमानाच्या भूमिकेत


या फोटोमध्ये ज्यामध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हनुमानाच्या भूमिकेत दिसतं आहे. कारण या फोटोमध्ये क्रिकेटचा देव सूर्यदेवाला (sunset Photos)गिळण्याचा प्रयत्न करत आहे.सचिन तेंडुलकरने 10 ऑक्टोबरच्या संध्याकाळी म्हणजेच सोमवारी वेगवेगळ्या पोझमध्ये 3 फोटो इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर केले आहेत. याशिवाय त्याने हे फोटो (interesting photos) शेअर करताना मजेशीर कॅप्शनदेखील दिलं आहे. 



तो कॅप्शनमध्ये लिहितो, 'सॉरी वेस्ट... जर आज तिथे सूर्य उगवला नाही. यासोबतच दोन वेडे इमोजीही पेस्ट करण्यात आले आहेत. सचिनचे हे फोटो पाहून चाहत्यांना बाल हनुमानाची आठवण (Remembering Child Hanuman) येत आहे, कारण सचिननेही सूर्याला त्याच्यासारखाच गिळण्याचा प्रयत्न केला आहे.


चाहत्यांनी देखील मजेदार कमेंट्स केल्या आहेत. कुणी लिहिले की हे काम फक्त क्रिकेटचा देवच करू शकतो, तर कुणी त्याला लवकर अंधारासाठी दोष देत आहे. कोणी हनुमान चालीसाचे दोहे लिहित आहे. काही वेळातच फोटो व्हायरल झाले.