सचिन तेंडुलकरचे हे 5 रेकॉर्ड कोहलीच काय कुणीच तोडू शकत नाही
क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा 24 एप्रिल हा दिवस खास आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा आज 45 वा वाढदिवस आहे. सचिनने प्रत्येक चाहत्याच्या मनात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे 2013 मध्ये सचिन निवृत्त होऊनही आजही चाहत्यांच्या मनातील ताईत आहे. आजही कोणत्या ना कोणत्या कारणाने सचिनच्या नावाचा उल्लेख केला जातो. 24 एप्रिल 1973 हा सचिन तेंडुलकरचा वाढदिवस आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
मुंबई : क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा 24 एप्रिल हा दिवस खास आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा आज 45 वा वाढदिवस आहे. सचिनने प्रत्येक चाहत्याच्या मनात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे 2013 मध्ये सचिन निवृत्त होऊनही आजही चाहत्यांच्या मनातील ताईत आहे. आजही कोणत्या ना कोणत्या कारणाने सचिनच्या नावाचा उल्लेख केला जातो. 24 एप्रिल 1973 हा सचिन तेंडुलकरचा वाढदिवस आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
1) एका वर्षात सर्वाधिक वनडे रन करणारा खेळाडू
प्रत्येक खेळाडू जेव्हा फॉर्ममध्ये येतो तेव्हा तो अनेक रन्स करतो आणि नवनवे रेकॉर्ड करतो. 1998 मध्ये सचिन तेंडुलकरही असाच फॉर्ममध्ये होता. यावेळी त्याने फक्त वन डे सामन्यात इतक्या धावा केल्या होत्या की, ज्या दुसरे खेळाडू संपूर्ण फॉर्मेटमध्ये मिळून करतात. 1998 मध्ये सचिन तेंडुलकरने 1894 धावा केल्या होत्या. आजपर्यंत वन डे सामन्यात तेवढा रेकॉर्ड कुणीच केलेला नाही.
2) टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त 50 हून अधिक स्कोर
सचिनने 200 टेस्ट सामन्यात 53.78 सरासरीत 15921 धावा केल्या आहेत. त्याने 119 वेळा 50 हून अधिक स्कोर केले आहेत. त्याच्या या रेकॉर्डपर्यंत अजून एकही खेळाडू पोहोचलेला नाही. एवढंच काय तर त्या आकड्याच्या जवळही कुणीही गेलेलं नाही. आतापर्यंत थोडा जवळ हा एलिएस्टर कुक आहे. आतापर्यंत त्याने 87 वेळा असं केलं आहे.
3) वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जास्त 50 हून अधिक स्कोर
वनडे क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने 145 वेळा 50 हून अधिक स्कोर केले आहेत. दुसऱ्या नंबरवर संगकारा आहे. ज्याने 118 वेळा हा कारनामा केला आहे. आतापर्यंत फक्त विराट कोहली आणि डिविलियर्स इथपर्यंत पोहोचले आहेत.
4) सर्वात जास्त 50
सचिन तेंडुलकरने त्याच्या संपूर्ण करिअरमध्ये 96 फिफ्टी केले आहेत. आतापर्यंत खेळत असलेल्या क्रिकेटर्समध्ये विराट कोहली तितपर्यंत पोहोचला आहे. आता त्याने आतापर्यंत सचिनच्या मुकाबल्यात 46 फिफ्टि केले आहेत.
5) सर्वात जास्त मॅन ऑफ द मॅच
सचिन तेंडुलकर आणि वन डे करिअरमध्ये सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच हा किताब जिंकला आहे. त्याने 463 धावांमध्ये 62 वेळा हा किताब आपल्या नावे केला आहे. दुसऱ्या नंबरवर जयसूर्या आहे. ज्याने 48 वेळा मॅन ऑफ द मॅच जिंकली आहे.