मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला मास्टरबास्टर सचिन तेंडूलकरचे रेकॉर्ड तोडण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे आणि ही प्रेरणा दुसरे तिसरे कोणी नाही तर खुद्द सचिन तेंडूलकरने दिली आहे. सचिन तेंडूलकरने वनडेमध्ये ४९ शतके करण्याचा एक खास रेकॉर्ड केला होता. मात्र सचिनचा तो रेकॉर्ड तोडत विराटने वनडेत ५० शतके केली तर सचिन त्याच्यासोबत शॅंपेन बॉटर शेअर करणार आहे. विराटने आतापर्यंत वनडेत ३५ शतकं केली आहेत. आणि विराटचा खेळ पाहता तो सचिनचे अधिकतर रेकॉर्ड तोडेल, अशी आशा आहे.


तर मी त्याला शॅपेनच्या ५० बॉटल्स गिफ्ट करेन....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इलेवन गाड्स अॅँड ए बिलियन इंडियंसच्या लॉन्चच्या वेळी सचिन तेंडूलकरला विचारले गेले की, जर विराटने वनडेत ५० शतकं करत तुमचा रेकॉर्ड तोडल्यास तुम्ही काय कराल? त्यावर सचिन म्हणाला की, मी त्याला शॅपेनच्या ५० बॉटल्स गिफ्ट करेन. पुढे सचिन म्हणाला की, ज्या दिवशी सचिन असे करेल त्यादिवशी मी स्वतः त्याच्याकडून जावून त्याच्यासोबत शॅपेन शेअर करेन. त्याच्या या उत्तरावर प्रेक्षकांनी टाळ्यांचा वर्षाव केला.



विराटच्या आयुष्यात सचिनचे खास स्थान


विराट कोहलीने ही अनेक मुलाखतीत ही कबुली दिली आहे की, त्याचे क्रिकेट करिअर सचिनला खेळताना बघूनच घडले आहे. २००८ मध्ये जेव्हा पहिल्यांदा विराटला सचिनसोबत ड्रेसिंग रुम शेअ्र करायची होती तेव्हा तो प्रचंड घाबरला होता. मात्र काळानुसार दोघांची चांगली मैत्री झाली आणि दोघेही एकमेकांचा सन्मान करताना दिसतात. त्याच्या विकासात सचिनचे मोठे योगदान असल्याचेही विराटने सांगितले. सचिन माझ्या आयुष्यातील खास व्यक्ती आहे आणि हे नाते नेहमीच असे राहील. हे नाते अत्यंत महत्त्वाचे आहे.