नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि राज्यसभेचा सदस्य सचिन तेंडुलकरनं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींना पत्र लिहीलं आहे. बोगस हेल्मेट बनवणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सचिननं या पत्रामध्ये केली आहे. दुचाकी वाहनांचे अपघात कमी करण्यासाठी चांगल्या प्रकारची हेल्मेट बनवणं आवश्यक असल्याचं या पत्रात सचिन म्हणाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन तेंडुलकर रस्ते सुरक्षा मोहिमेच्याअंतर्गत सोशल नेटवर्किंगवर जनजागृतीचं काम करत आहे. गाडी थांबवून बाईकस्वारांना हेल्मेट घालण्याची विनंती सचिन तेंडुलकरनं केली होती. हा व्हिडिओ सचिननं काही दिवसांपूर्वी ट्विटरवर शेअर केला होता. मागच्यावर्षी एप्रिल महिन्यामध्येही सचिननं युवकांना हेल्मेट घालून बाईक चालवण्याचं आवाहन केलं होतं.



एलफिन्सटन स्टेशन रेल्वे पूल दुर्घटनेनंतर सचिननं त्याच्या खासदार निधीतून पुलाच्या बांधकामासाठी मदत केली होती. तसंच दुसऱ्या पुलांची डागडुजी करण्याची विनंतीही सचिननं रेल्वेला पत्र लिहून केली होती.