मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) एक मागणी केली आहे. या मागणीचा बीसीसीआय विचार करुन त्याची अंमलबजावणी करणार का? याची उत्सुकता लागलेय.


सचिन तेंडुलकरचे आवाहन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय दृष्टिहीन संघाने विश्वचषक जिंकून चांगली कामगिरी केली आहे. राष्ट्रीय दृष्टिहीन क्रिकेट संघटनेला (सीएबीआय) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मान्यता द्यावी तसेच त्यांना मंडळाच्या निवृत्तिवेतन योजनेचा लाभ द्यावा, असे आवाहन सचिन तेंडुलकर याने केले आहे.


सचिनचे बीसीसीआयला पत्र


बीसीसीआयच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद राय यांना सचिनने पत्र लिहिले आहे.  सलग चौथ्यांदा भारतीय संघाने दृष्टिहीन खेळाडूंच्या विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद मिळविले आहे, असे पत्रात म्हटलेय.


हे खेळाडू संघर्ष करत आहेत


हे खेळाडू अतिशय संघर्ष करत आहेत. त्यांनी मिळवलेले विजेतेपद केवळ दृष्टिहीन खेळाडूंसाठी नव्हे तर अन्य खेळाडूंसाठीही प्रेरणादायी आहे. यापूर्वी मंडळाने दृष्टिहीन खेळाडूंना सहकार्य केले होते. पुन्हा तसेच सहकार्य करताना निवृत्तिवेतनाचा त्यांना फायदा दिला पाहिजे, असे सचिने पत्रात म्हटलेय.


सीएबीआयला मान्यता दिली तर दृष्टिहीन खेळाडूंचे अनेक प्रश्न सुटतील. तसेच नवोदित दृष्टिहीन खेळाडूंनाही नवी संधी उपलब्ध होईल, असेही सचिनने  म्हटलेय.