मुंबई : रोड सेफ्टीसाठी सरकार अनेक स्तरांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 मात्र सचिन तेंडुलकरने नुकतेच स्वतः गाडी थांबवून त्याच्या चाहत्यांना हेल्मेट घालण्याचे आवाहन करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.  
 दुचाकी स्वारांना हेल्मेट घालण्याची सक्ती आहे. मात्र अनेकदा चालकाच्या मागे बसणारी व्यक्ती हेल्मेट घालत नाही. पण अपघात झाल्यास चालकाइतकाच त्याच्या मागे बसणार्‍या व्यक्तीलाही धोका असतो हे त्यांच्या लक्षात येत नाही. म्हणूनच सचिन तेंडुलकरने त्याच्या चाहत्यांना रस्त्यामध्ये थांबून हा महत्त्वाचा संदेश दिला आहे. 
  
 प्रवासादरम्यान सचिनचा व्हिडिओ शूट करण्यात आला. त्याने तो सोशल मीडियावर अपलोड करत चालकांना आणि पाठी बसणार्‍या व्यक्तीलाही हेल्मेट घालण्याचे आवाहन केले आहे. 
 क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर सचिन अनेक सामजिक उपक्रमांमध्ये सक्रिय झाला आहे. तो सध्या राज्यसभेचा खासदार आहे. काही दिवसांपूर्वी त्याने वांद्रा थेथील बॅन्ड स्टॅन्ड परिसरात स्वच्छता अभियान राबवले होते. त्यावेळेसही नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखावी याकरिता खास मोहिम राबवून भारतीयांना ' स्वच्छ भारत' बाबत आवाहन केले होते.