सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनने ऑस्ट्रेलियात केली धमाल
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मुलाने रचला विक्रम.....
सिडनी : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मुलाने रचला विक्रम.....
18 वर्षाच्या अर्जुन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाच्या स्प्रिट ऑफ ग्लोबल चॅलेंजमध्ये सहभाग घेऊन सिडनी क्रिकेट मैदानावर बॅट आणि बॉलने शानगार प्रदर्शन केलं आहे. टी 20 मॅचमध्ये भारत क्रिकेट क्लबमार्फत ओपनर खेळणाऱ्या अर्जुनने मस्त प्रदर्शन केलं. फक्त 27 बॉलमध्ये 48 धावा केल्या आहेत. एवढंच नाही तर अर्जुनच्या बॉलने देखील आज कमाल केली आहे. ज्यामध्ये त्याने चार विकेट देखील घेतल्या आहेत.
अर्जुनने सामन्यानंतर सांगितले की, मी लहानपणापासूनच फास्ट बॉलला पसंत करतो. मला वाटलं भारतात फास्ट बॉलर फार कमी आहेत. मोठं होतानाच मी मजबूत देखील होत आहे. भारतासाठी मी स्वतःची फास्ट बॉलर म्हणून ओळख निर्माण करू इच्छितो.
असं सांगितलं जातं की, सचिन देखील आपल्या क्रिकेट करिअरची सुरूवात देखील फास्ट बॉलर म्हणून इच्छित होता. यासाठी तो डेनिस लिलीच्या कार्यक्रमात भाग देखील घेण्यासाठी गेला होता. तेव्हा लिलीने सचिनला मार्गदर्शन केलं होतं की, तुझी हाईट कमी आहे. आणि तुला बॅटिंगवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. आणि याच निर्णयाने सचिनचे संपूर्ण आयुष्य बदललं.
वडिलांचं स्वप्न पूर्ण करणार अर्जुन ?
असं वाटतंय अर्जुन आपल्या वडिलांचं म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं ते अधुरं स्वप्न पूर्ण करणार आहे. अर्जुन तेंडुलकर एक फास्ट बॉलर म्हणून नवी उभारी घेत आहे. कूच बिहार ट्रॉफीच्या अंडर 19 मध्ये 18 वर्षीय अर्जुनने शानदार बॉलिंग केली. त्याने टीम मुंबईला रेल्वेच्या विरूद्ध खेळताना 5 विकेट घेऊन दिले. एका दुसऱ्या मॅचमध्ये देखील त्याने 11 ओव्हरमध्ये 44 धावा करून 5 विकेट घेतल्या