सचिन तेंडुलकरने `सेहवाग`ला वाढदिवसाच्या उलट्या-पुलट्या शुभेच्छा
`नजफगढचा नवाब` आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करतोय. या प्रसंगी जगभरातील खेळाडू आणि चाहत्यांनी सेहवागला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
नवी दिल्ली : 'नजफगढचा नवाब' आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करतोय. या प्रसंगी जगभरातील खेळाडू आणि चाहत्यांनी सेहवागला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
सेहवागच्या ट्विटरवर सकाळपासून शुभेच्छांचा पाऊस पडत होता. पण यात सर्वात मजेदार शुभेच्छा 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर याने दिल्या आहेत. नेहमी धीर गंभीर स्वभावाचा सचिन यावेळी सेहवागला एका अनोख्या अंदाजात जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
असे म्हणावे लागेल की सेहवागला सचिनने एक मजेदार ट्विट करून बर्थ डे विश केले आहे. सचिन तेंडुलकर आणि सेहवाग एक वेगळे नाते शेअर करतात.
दोन्ही भारतासाठी ओपनिंग फलंदाज होते. पण सेहवाग - गंभीर ही ओपनिंग जोडी समोर आल्यावर सचिन सेहवाग यांची जोडी कुठेतरी हरवल्यासारखी वाटली. एक काळ असा होता की सेहवाग आणि सचिन कोणत्याही भीती शिवाय मैदानात उतराचे आणि गोलंदाजांचा धुवाँ उडवायचे.
या ट्विटमध्ये सचिन म्हटला की सेहवाग असा व्यक्ती होता जो मैदानात त्याला जे पाहिजे ते करायचा. सेहवागच्या हट्टी स्वभावाचा उल्लेख करत ट्विट उलटे टाकले आहे. आपल्या ट्विटमध्ये तो म्हटला की हॅप्पी बर्थ डे वीरू! नव्या वर्षाची चांगली सुरूवात. मी जेव्हा तुला फिल्डवर काही सांगत होतो ते तू नेहमी उलटे करायचा. आता माझ्याकडून हे घे. सचिनच्या ट्विटचा प्रत्येक शब्द उल्टा लिहिला आहे.
सचिनच्या शुभेच्छाला सेहवागने उत्तर देत धन्यवाद म्हटले आहे.