मुंबई : अनेकदा खेळाडूंना मैदानावर खेळताना पाहिल्यावर तुमच्या मनातंही हा प्रश्न उपस्थित राहिला असेलच की, खेळताना खेळाडूला टॉयलेटला जायची वेळ आली तर? या सर्व गोष्टींवर अद्याप ठोस उत्तर नाही. क्रिकेटच्या मैदानावर कोणीही खेळाडू मधेच फलंदाजी थांबवून टॉयलेटला जाताना क्वचितच कोणी पाहिलं असेल. मात्र कालच्या आयपीएलमध्ये असा प्रकार पहायला मिळला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरात टायटन्स विरूद्ध पंजाब किंग्ज यांच्यात सांना रंगला होता. या सामन्यादरम्यान एक विचित्र प्रकार कॅमेरात कैद झाला. गुजरातचा डाव सुरु असताना साई सुदर्शनला खेळ सुरु असतानाच मध्येच टॉयलेट ब्रेक घ्यावा लागला. 


साई सुदर्शनने अचानक टॉयलेट ब्रेक घेतल्याने खेळ काहीवेळ थांबवावा लागला. 8व्या ओव्हरच्या शेवटी साई सुदर्शन खेळपट्टी सोडून टॉयलेटकडे धावत गेला. त्यानंतर विरोधी टीमचे खेळाडू आणि शुभमन गिल यांना या सुदर्शनची प्रतिक्षा करावी लागली. दरम्यान या घटनेचा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.



साई सुदर्शन धावत धावत टॉयलेटमधून बाहेर आला. यानंतर तातडीने त्याने शुभमन गिलला खेळण्यासाठी ज्वाईन केलं. साई सुदर्शनने ज्यावेळी ब्रेक घेतला त्यावेळी तो 14 बॉल्समध्ये 21 रन्सवर खेळत होता.


कालच्या या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वामध्ये गुजरातने तिसरा विजय मिळवला आहे. मयंक अग्रवालला चार सामन्यांपैकी 2 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. गुजरातच्या विजयानंतर पॉईंटटेबलचं समीकरणही बदललं. गुजरात पॉईंट टेबलवर दुसऱ्या स्थानावर आलं.