मुंबई : बॅडमिंटनपटू आणि फुलराणी म्हणून ओळखली जाणारी सायना नेहवाल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमुळे जोरदार चर्चेत आहे. दरम्यान, समोर आलेल्या फोटोंमध्ये काहीतरी खास आहे, असे चाहत्यांचे म्हणणे आहे.  'तुम्ही दोघे एकमेकांसाठी अगदी अनुरुप आहात', असे चाहत्यांनी म्हटले आहे. त्यामुळे ती प्रेमात पडल्याची चर्चा रंगत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायना हे जबरदस्त खेळामुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र सायना प्रेमात पडल्याच्या  गोष्टीसाठी चर्चेत आली आहे. ही चर्चा सुरू झाली आहे ती सायनाच्या इस्टाग्रामवरील फोटोवरुन. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल आणि  बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप यांचा फोटो सध्या चर्चेचा झालाय.


सायना आणि कश्यपचे एकमेकांसोबतचे फोटो पाहून दोघांच्याही चाहत्यांनी अनेक तर्क लढवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, दोघांमध्ये काहीतरी चाललंय नक्की, अशी चर्चा आहे. सायना आणि पारुपल्ली कश्यप हे एकमेकांच्या प्रेमात पडल्याचेही म्हटले जात आहे. परंतु अधिकृत माहिती हाती आलेली नाही. दरम्यान, ऑलिम्पिकमधील कांस्यपदकविजेती सायना आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक पारुपल्ली कश्यप यांच्यातील नात्याची खूप दिवसांपासून चर्चा होती. त्यामुळे या फोटोवरुन त्यात तथ्य असल्याचे म्हटले जातेय.