IPL 2022: `या` स्टार खेळाडूवर घरी बसून IPL पाहण्याची वेळ!
गेल्या 2 वर्षांपासून तो चेन्नईच्या टीममधून खेळला होता. दरम्यान आता तो आयपीएलचा भाग नाहीये.
मुंबई : इंग्लंड क्रिकेट टीमचा युवा खेळाडू सॅम करन दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएलमध्ये खेळू शकला नाही. या दुखापतीमुळे तो तब्बल 5 महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानापासून लांब आहे. शिवाय याच कारणामुळे तो आयपीएलच्या मेगा ऑक्शनमधून सामील झाला नव्हता. गेल्या 2 वर्षांपासून तो चेन्नईच्या टीममधून खेळला होता. दरम्यान आता तो आयपीएलचा भाग नसून यंदाच्या आयपीएलबाबत करनने मोठं वक्तव्य केलं आहे.
दुखापतीने त्रस्त असलेला सॅम करन आयपीएल 2022 बद्दल म्हणाला की, त्याला या सिझनमध्येही जगातील नंबर वन टी-20 लीगचा भाग व्हायचं होतं. परंतु, तो सामील होऊ शकला नाही. या सिझनमध्ये सहभागी न झाल्यामुळे करनही थोडा निराश झाला आहे.
सॅम म्हणतो, मी यंदाची आयपीएल खेळू शकत नसल्यामुळे निराश आहे. घरी बसून आयपीएल पाहणे निराशाजनक आहे. मला ऑक्शनमध्ये भाग घ्यायचा होता. पण, शेवटी मी तसं केलं नाही, जो कदाचित योग्य निर्णय होता.
गेल्यावर्षी दुबईमध्ये आयपीएल खेळताना करनला लोअर बॅकमध्ये फ्रॅक्चर झाल्याची दुखापत झाली होती. लवकरच त्याला आयपीएलमध्ये परत येण्याची इच्छा असल्याचंही त्याने सांगितलं आहे.
सॅम पुढे म्हणतो, मला आयपीएलमध्ये परत खेळायचं आहे कारण तिथे तुम्हाला तुमच्या T20 खेळाबद्दल बरंच काही शिकायला मिळतं. ही एक अशी स्पर्धा आहे जिथे तुम्ही फक्त क्रिकेटबद्दल बोलता आणि शिकता.