दिल्ली कॅपिटल्सच्या माजी खेळाडूचा `खेळ` खल्लास; कोर्टाने सुनावली 8 वर्षांच्या कारावासाची शिक्षा!
Sandeep Lamichhane In Prison : दिल्ली कॅपिटल्सचा माजी खेळाडू आणि नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाने याला काठमांडू जिल्हा न्यायालयाने 8 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
Sandeep Lamichhane Sentenced In Prison : दिल्ली कॅपिटल्सचा माजी खेळाडू आणि नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) याला काठमांडू जिल्हा न्यायालयाने (Kathmandu District Court) शुक्रवारी बलात्कारप्रकरणी दोषी ठरवलं होतं. अशातच आता संदीप लामिछाने याला काठमांडू न्यायालयाने आठ वर्ष तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. काठमांडू पोस्टने याबाबत माहिती दिली आहे. आरोपी लामिछाने याने 21 ऑगस्टच्या रात्री 17 वर्षीय मुलीवर बलात्कार केला होता. जिल्हा न्यायालयाने 7 सप्टेंबर रोजी लामिछाने याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं होतं. त्यानंतर त्याने स्वतः शरण येण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्याला विमानतळावर अटक करण्यात आली होती.
संदीपला 8 वर्षांची शिक्षा सुनावली अशी माहिती कोर्टाच्या अधिकाऱ्यांनी एएफपीला दिली आहे. त्यामुळे आता संदीप लामिछाने याचं क्रिकेटर करियर जवळजवळ संपुष्टात आलं आहे. संदीपने वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी नेपाळसाठी 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामुळे आता नेपाळ क्रिकेटने आपला तगडा खेळाडू गमावला आहे.
संदीपवर आरोप काय आहेत ?
संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) एका 17 वर्षाच्या मुलीला काठमांडू आणि भक्तीपूरमध्ये घेऊन गेला. त्यावेळी त्यानं काठमांडूतील सिनामंगल येथील हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर प्रकरण आणखीन चिघळल्यानंतर संदीपला नेपाळ क्रिकेट संघाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं. यावेळी लामिछाने कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळत होता. या लीगमध्येही तो त्याच्या संघातून बाहेर काढण्यात आलंय. वॉरंट बजावल्यानंतर संदीप लामिछाने फरार झाला होता, त्याचे लोकेशन मिळत नव्हते. यानंतर नेपाळ पोलिसांनी संदीपला अटक करण्यासाठी इंटरपोलची मदत घेतली. त्यानंतर इंटरपोलने संदीपविरोधात ‘डिफ्यूजन’ नोटीस जारी केली होती.
दरम्यान, संदीप लामिछाने हा जगभरातील क्रिकेट लीगमध्ये खेळणारा एकमेव नेपाळी खेळाडू आहे. आयपीएलमध्ये खेळणारा संदीप नेपाळचा पहिला क्रिकेटपटूही ठरला आहे. यासह, तो ऑस्ट्रेलियन बिग बॅश लीग, कॅरेबियन प्रीमियर लीग आणि लंकन प्रीमियर लीगसह अनेक लीगमध्ये खेळला आहे. 2018 मध्ये संदीपला पहिल्यांदा ओळख मिळाली, जेव्हा तो पहिल्यांदा IPL खेळला होता. संदीपला दिल्ली डेअरडेव्हिल्सने (DD) 20 लाख रुपयांना विकत घेतलं होतं.