मेघा कुचिक / Mumbai Cricket Association president election : 11 वर्षांनंतर भारताचा एक प्रतिष्ठित माजी क्रिकेटपटू मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत अनुभवी राजकारण्याशी भिडणार आहे. मुंबई क्रिकेट संघटनेची 20 ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत आधी पाटील (विजय) विरुद्ध पाटील (संदीप) असा सामना रंगणार असे बोलले जात होते. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता हा सामना रंगणार आहे अनुभवी माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू संदीप पाटील (Sandeep Patil ) आणि भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यामध्ये....(Sandeep Patil vs Ashish Shelar to contest Mumbai Cricket Association president election)


तेव्हा विलासराव देशमुख यांनी मारली होती बाजी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी 2011 मध्ये क्रिकेटपटू विरुद्ध राजकारणी असा सामना रंगला होता. त्यावेळी भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर हे एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्राचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडून पराभूत झाले होते.


आशिष शेलार यांची गेल्या महिन्यात बीसीसीआयच्या निवडणुकीत आणि 18 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एमसीएचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड केली आहे. त्यांना बीसीसीआयमध्येही पदाधिकारी म्हणून निवडणूक लढवता येऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने 14 सप्टेंबर रोजी दिलेल्या आपल्या निर्णयात खासदार, आमदारांना क्रिकेट संस्थांमध्ये पदे घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आशिष शेलार एमसीए अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्यास पात्र ठरले आहेत.


आशिष शेलार यांची 2015 मध्ये एमसीएचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली होती. त्यानंतर 2017 मध्ये लोढा समितीच्या शिफारशीनुसार शरद पवारांनी एमसीए अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आशिष शेलार अध्यक्ष बनण्यासाठी पात्र ठरले. शेलार यांच्या कार्यकाळातच एमसीएने  मुंबई T20 लीग सुरू केली.    


दरम्यान, शरद पवार गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार संदिप पाटील हे ६ ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.