भारतीय बॅडमिंटनपटू सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी अधिकृतरित्या या चर्चा, दाव्यांवर काही भाष्य केलेलं नाही. दरम्यान सानिया मिर्झाच्या एका कृत्यामुळे पुन्हा एकदा दोघांच्या नात्यात अंतर आल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. सानिया मिर्झा सोशल मीडियावर फार सक्रीय असते. अनेक छोट्या मोठ्या गोष्टी ती सोशल मीडियावरुन चाहत्यांसोबत शेअर करत असते. दरम्यान नुकतंच तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंवरुन शोएब मलिकचे सर्व फोटो डिलीट केले आहेत. यामुळे दोघांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शोएब मलिकने आपल्या इंस्टाग्राम बायोमध्ये सानिया मिर्झासोबत विवाहित असल्याची माहिती काढून टाकली आहे. याआधी त्याने आपल्या बायोमध्ये एका सुपरवुमनचे पती असल्याचा उल्लेख केला होता. घटस्फोटांच्या या चर्चांसंबंधी शोएबला विचारण्यात आलं असता त्याने म्हटलं होतं की, 'बातम्या सुरु आहेत, संबंध चांगले नाहीत, यावर तुमचं काय म्हणणं आहे'.


सानिया आणि शोएबला एक मुलगा


सानिया आणि शोएब यांना एक मुलगा आहे. सानिया मिर्झा नेहमी सोशल मीडियावर आपल्या मुलासोबतचे फोटो शेअर करत असते. 2018 मध्ये त्यांच्या मुलाचा जन्म झाला.


आयशा उमरसोबत शोएब मलिकच्या अफेअरच्या चर्चांमुळे नात्यात दुरावा?
शोएब मलिक पाकिस्तानी अभिनेत्री आयशा उमरसह गुप्तपणे नात्यात असल्याचे अनेक दावे केले जात आहेत. यामुळे सानिया मिर्झाने पतीपासून अंतर घेतल्याचं बोललं जात आहे. पण आयशाने हे सर्व दावे फेटाळले आहेत. आपण कधीच विवाहित पुरुषासोबत संबंध ठेवणार नाही असं सांगत तिने या चर्चांना पूर्णविराम दिला होता. 


घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान सानिया मिर्झाची उपहासात्मक पोस्ट


भारतीय बॅडमिंटनपटू सानिया मिर्झाने काही दिवसांपूर्वी एक उपहासात्कम पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने म्हटलं होतं की, "जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या मनाची शांतता संपवतं, तेव्हा त्याला जाऊ द्यावं". या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. सानिया मिर्झाने आता शोएब मलिकपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचा दावा काही नेटकरी करु लागले होते. पण आता दोघांनी खरंच घटस्फोट घेतला आहे का हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल.