Shoaib Malik Sana Javed Marriage : भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाचा संसार मोडला आहे.  पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्नगाठ बांधली आहे. शोएब मलिक आणि सना जावेदच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हारल झाले आहेत. त्यानंतर तब्बल 14 वर्षांनी सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांचा घटस्फोट झाल्याचे बोललं जात आहे. त्यातच आता शोएब मलिकच्या कुटुंबाची प्रतिक्रिया समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शोएब मलिकने तिसरे लग्न केल्यानंतर त्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. मात्र शोएब आणि सनाच्या लग्नाला शोएबच्या कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित नव्हता, अशी माहिती समोर येत आहे. शोएबने सानियासोबत घटस्फोट घेतल्याने त्याचा कुटुंबिय नाराज झाले आहेत. त्यामुळेच त्याच्या कुटुंबातील व्यक्ती गैरहजर असल्याचे बोललं जात आहे. त्यातच आता त्याच्या कुटुंबातील व्यक्तीची प्रतिक्रिया समोर आली आहे. शोएब मलिकचा मेहुणा इम्रान जफर याने नुकतंच शोएबच्या लग्नाबद्दल प्रतिक्रिया दिली. "मला शोएब आणि सनाच्या लग्नाची माहिती सोशल मीडियाद्वारे मिळाली. त्यांच्या लग्नाला मलिक कुटुंबातील एकाही व्यक्तीने हजेरी लावलेली नाही", असे इम्रान जफर यांनी सांगितले.


शोएब आणि सानियाचा घटस्फोटामुळे कुटुंब दुःखी?


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शोएबचे कुटुंब सानियासोबत घटस्फोट घेण्याच्या विरोधात होते. शोएब आणि सानियामध्ये असलेले मतभेद दूर करण्यासाठी तसेच त्यांच्या वैवाहिक समस्या सोडवण्यासाठी त्यांचे कुटुंब दुबईलाही गेले होते. त्यावेळी त्यांनी शोएबला समजावले होते. पण शोएबने कुटुंबाचे ऐकण्यास नकार दिला होता. शोएब आणि सानियाचा घटस्फोट झाल्यानंतर त्याचे कुटुंब खूप दुःखी होते. 


शोएब आणि सना हे दोघेही खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. पण याबद्दल त्या दोघांनीही कधीही भाष्य केले नाही. त्यानंतर आता शोएब मलिकने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत निकाह केल्याचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. त्याच्या या फोटोला कॅप्शन देताना शोएबने Alhamdullilah, आणि आम्ही दोघेही आता जोडी म्हणून एकत्र आलो, असे म्हटले आहे. शोएब मलिक आणि सना जावेदच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


शोएबचे तिसरे लग्न


दरम्यान शोएबचे हे तिसरे लग्न असून सनाचे हे दुसरे लग्न आहे. शोएबने 2002 मध्ये आयेशा सिद्दीकीसोबत लग्न केले होते. मात्र त्या दोघांनी 2010 ला घटस्फोट घेतला. त्यानंतर तो 2010 मध्ये भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झासोबत लग्नबंधनात अडकला. यानंतर आता 2024 मध्ये शोएबने तिसऱ्यांदा निकाह केला आहे. त्याने सना जावेदसोबत लग्न केल्याचे जाहीर केले आहे. पण त्याचा आणि सानिया मिर्झाचा घटस्फोट झाला का? याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.