Sania Mirza Instagram Post: भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) सध्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या घटस्फोटाच्या चर्चांना शोएब मलिकने  (Shoaib Malik) पूर्णविराम दिला होता. शोएब मलिकने सोशल मीडियावर सना जावेदशी (Sana Javed) लग्न केल्याचे फोटो शेअर करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. यानंतर शोएब मलिक आणि सानिया मिर्झा अधिकृतपणे वेगळं झाल्याचं उघड झालं. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक 2010 मध्ये विवाहबंधनात अडकले होते. त्यांना एक मुलगाही आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान शोएब मलिकशी घटस्फोट झाल्यानंतर माजी टेनिसपटू सानिया मिर्झाने (Sania Mirza) पहिल्यांदाच सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट शेअर केली आहे. 26 जानेवारीच्या मध्यरात्री तिने इंस्टाग्रामला (Instagram) फोटो शेअर केला. यावेळी पोस्टमध्ये तिने फक्त एक शब्द लिहिला आहे. 


सानिया मिर्झाने शेअर केलेल्या फोटोत ती आरशात पाहताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना तिने पोस्टमध्ये तिने Reflect म्हणजेच प्रतिबिंबित असं लिहिलं आहे. 



घटस्फोट झाल्यानंतरही सानिया मिर्झाने अनेक महिने मौन बाळगलं होतं. शोएबनेही यावर भाष्य करणं टाळलं होतं. दोघेही भाष्य करत नसल्याने वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात होते. पण अखेर शोएब मलिकने इंस्टाग्रामला सना जावेदशी लग्न केल्याचे फोटो शेअर केले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. यानंतर सानिया मिर्झाच्या वडिलांनी घटस्फोट झाल्याचं जाहीर केलं. 


सानिया मिर्झाच्या टीमने 21 जानेवारीला स्टेटमेंट जारी केलं. यामध्ये त्यांनी दोघेही मागील अनेक महिन्यांपासून वेगळे असल्याची माहिती दिली. तसंच चाहत्यांनी कोणतेही अंदाज लावू नयेत असं आवाहन केलं. 


“सानियाने नेहमीच आपलं खासगी आयुष्य लोकांपासून दूर ठेवलं आहे. मात्र, आज तिचा आणि शोएब यांचा घटस्फोट होऊन काही महिने झाले आहेत, हे सांगण्याची आज गरज निर्माण झाली आहे. तिने शोएबला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या आयुष्याच्या या संवेदनशील काळात, आम्ही सर्व चाहत्यांना आणि हितचिंतकांना विनंती करू इच्छितो की त्यांनी कोणतेही अंदाज लावू नयेत. तसंच तिच्या गोपनीयतेच्या गरजेचा आदर करावा,” असं निवेदनात म्हटलं आहे.


शोएब मलिक आणि सानियाने गतवर्षी दुबईत आपल्या मुलाचा 5 वा वाढदिवस साजरा केला होता. सानियाने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तिचा शेवटचा ग्रँड स्लॅम सामना खेळला तेव्हाही, मलिकने तिच्या कारकिर्दीतील कामगिरीचे कौतुक करणारी पोस्ट लिहिली होती. दोघांनी युएईमध्ये एकत्र टॉक शोदेखील आयोजित केला होता.