Sania Mirza and Shoaib Malik Divorce Rumors: भारतीय महिला टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) दोघेही घटस्फोटामुळे चर्चेत आले आहेत. सगळीकडे सानिया आणि शोएबने घटस्फोट (Sania Mirza Shoaib Malik) घेतल्याच्या बातम्या पसरल्या आहेत. मात्र, यावर सानिया किंवा शोएबनं प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीनंतर त्या दोघांच्या जुन्या रिलेशनशिप देखील चर्चेत आल्या होत्या. दरम्यान, सानियानं नुकत्याच शेअर केलेल्या त्या पोस्टमुळे काही नेटकरी आनंदीत झाले आहेत तर काही नेटकरी संतापले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेही वाचा :  'आता येणारी वेळच सांगणार...', अभिनेत्रीला आधीच लागली होती मृत्युची चाहूल?


सानिया आणि शोएब विभक्त झाल्याच्या बातम्या या सानियानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या एका पोस्टमुळे सुरु झाल्या होत्या. एवढंच काय तर दोघांनी घटस्फोट झाल्याचे देखील म्हटले जात होते. या सगळ्यात सानिया आणि शोएबचा 'द मिर्झा मलिक शो' हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या शोची रिलीज डेट आता समोर आली आहे.  ( The Mirza Malik Show Released Date )



उर्दूफ्लिक्स नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटनं 'द मिर्झा मलिक शो'चे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये सानिया आणि शोएब एकत्र आनंदी आणि परफेक्ट कपल दिसत आहेत. हे पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये दिले की, 'द मिर्झा मलिक शो' लवकरच उर्दूफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.' याआधी मार्च 2022 मध्ये शोएबने 'द मिर्झा मलिक शो'ची घोषणा केली होती. (sania mirza shoaib malik coming togeather soon amid divorce news) 


सानियाच्या नवऱ्याचे पाकिस्तानी अभिनेत्रीसह फोटोशूट


साधारण वर्षभरापूर्वी शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा ओमरसोबत फोटोशूट केले होते. स्विमिंगपूलमध्ये काढण्यात आलेले बोल्ड आणि हॉट फोटो आयेशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले होते. एका लोकल मॅग्जीनच्या कव्हरपेजसाठी या दोघांनी हे फोटोशूट केले होते. आयेशाने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.