मुंबई : भारताची टेनिसपटू सानिया मिर्जा आणि शोएब मलिक यांच्या आयुष्यात नवा पाहुणा येणार आहे. ही आनंदवार्ता तिने इंस्टाग्रामवर एक क्यूट फोटो शेअर करत चाहत्यांना दिली. दिली. फोटो शेअर करत सानियाने लिहिले- बेबी मिर्जा-मलिक. आता तिचे नवे फोटोज सोशल मीडियावर दिसत आहेत. यात ती व्यायाम करताना दिसत आहे. प्रेग्नेंसीमध्येही फिट राहण्यासाठी ती व्यायाम करत आहे.


पहा सानियाचे व्यायाम करतानाचे फोटोज...




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांनी १२ एप्रिल २०१० मध्ये लग्न केले. दोन महिन्यांपूर्वीच तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत ही गोड बातमी जगाला दिली.


सानिया-शोएबचा मोठा निर्णय


सानियाने गोवा फेस्ट २०१८ मध्ये लैगिंक पक्षपातबद्दलच्या एका कार्यक्रमात सांगितले की, मी आणि माझ्या पतीने आमच्या होणाऱ्या मुलाचे आडनाव मिर्झा-मलिक असेल असा निर्णय घेतला आहे. आम्हाला एक मुलगी हवी आहे.