Mumbai Indians vs Rajasthan Royals : आयपीएलचा चौदावा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स (MI vs RR) यांच्यात खेळला जाणार आहे. राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता रोहित शर्माची (Rohit Sharma) फलंदाजी वानखेडेवर आग ओकणार का? असा सवाल विचारला जातोय. मुंबई पहिल्यांदाच घरच्या मैदानावर सामना खेळणार असल्याने आता हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली पलटण विजय मिळवणार का? अशी चर्चा होताना दिसत आहे. अशातच आता टॉसवेळी हार्दिकला डिवचणाऱ्या प्रेक्षकांना संजय मांजरेकरांनी तंबी दिल्याचं दिसून आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय झालं?


मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पांड्या आणि राजस्थान रॉयल्सकडून संजू सॅमसन टॉससाठी मैदानात आला होता. त्यावेळी टॉससाठी संजय मांजरेकर टॉसचे समालोचक म्हणून मैदानात होते. त्यावेळी स्टेडियमवरील प्रेक्षक रोहित रोहितचा नारा लगावताना दिसले. संजय मांजरेकर यांनी टॉसवेळी मुंबईच्या वानखेडे मैदानावर उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांना तंबी दिली. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्यासाठी टाळ्या वाजवा अन् नीट वागा, असं संजय मांजरेकर यावेळी म्हणाले. त्यावेळी हार्दिक पांड्या हसताना दिसला. 



रोहितच्या चाहत्यांचा कल्ला


 मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन हार्दिक पांड्या (Hardik Pandya) वानखेडेवर जोरदार ट्रोल होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती आणि तसंच होताना दिसलं. मुंबईचा राजा रोहित शर्मा.... अशा घोषणा रोहितचे चाहते वानखेडे बाहेर देत आहेत. वाखनेडे मैदानाबाहेर लांबच्या लांब रांगा देखील लागल्या आहेत.


मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन, रोहित शर्मा, नमन धीर, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या (C), टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, आकाश मधवाल, जसप्रीत बुमराह, क्वेना मफाका.


राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (C), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल.