मुंबई : दिल्ली विरुद्ध राजस्थान झालेल्या सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. अंपायरने दिलेल्या एका नो बॉलच्या निर्णयावरून दिल्लीचा कर्णाधार ऋषभ पंत चांगलाच तापला होता. या सामन्यात पंतने आपल्या टीमच्या खेळाडूंना मैदानातून परत बोलवून घेतलं. मात्र यावेळी नेमकं काय झालं? या प्रकरणाची दुसरी बाजू काय आहे हे सामन्यानंतर संजू सॅमसनने सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेवटच्या ओव्हरमध्ये दिल्लीला विजयासाठी 36 रन्सची गरज होती. ओबेद मेकॉयला यावेळी 3 बॉलवर 3 सिक्स बसले. पण तिसरा बॉल नो बॉल असल्याचं पंत म्हणाला. मात्र अंपायरने तो नो बॉल दिला नाही. 


अंपायरच्या निर्णयावर चिडलेल्या पंतने आपल्या टीममधील खेळाडूंना क्रीझ सोडून बाहेर येण्यासाठी सांगितलं. कोचने मध्यस्ती केल्यानंतर पुढे मॅच सुरू झाली. अंपायर नो बॉल चेक करू शकला असता मात्र त्याने तसं केलं नाही.


दरम्यान या नो बॉलच्या प्रकरणावर बोलताना राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन म्हणाला की, "तो एक फुल टॉस बॉल होता. यावेळी फलंदाजाने नो बॉल देण्याची मागणी केली मात्र अंपायरने ऐकलं नाही. अंपायरने त्या बॉलला सामान्य करार दिला. अंपायरने स्पष्टपणे त्याचा निर्णय स्पष्ट केला." 


सॅमसन पुढे म्हणाला, "आम्ही मेकॉयचा विचार करत होतो. त्याच्या चेहऱ्यावर आम्हाला हसू फुलवायचं होतं. कारण एकाच ओव्हरमध्ये 3 सिक्स बसणं हे कोणत्याही गोलंदाजासाठी कठीणंच आहे. आम्ही योजना बदलू इच्छित होतो आणि त्यासाठी आम्ही थोडा वेळ घेतला. मात्र शेवटची ओव्हर खरंच कठीण होती."


शेवटच्या ओव्हरदरम्यान अंपायरच्या निर्णयाचा पंतला राग आला. त्याने मैदाना सोडून खेळाडूंना बाहेर येण्याच्या सूचना दिल्या. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.