मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिने मॉडेलिंग जगतात एन्ट्री केली आहे. अलीकडेच साराने आंतरराष्ट्रीय ब्रँड एंडोर्समेंट केले आहे, त्यानंतर ती सर्वत्र चर्चेत आहे. इंडस्ट्रीत येण्यापूर्वीच साराने सोशल मीडियावर वर्चस्व गाजवले आहे. साराचे इन्स्टाग्रामवर 1.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. साराप्रमाणेच अनेक स्पोर्ट्स स्टार्सची मुलं आहेत ज्यांनी इंडस्ट्रीत प्रवेश केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रीडा जगतातील असे अनेक स्टार्स आहेत ज्यांच्या मुलांनी मनोरंजन क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यात बऱ्याच मोठ्या सेलिब्रिटी कलाकारांच्या नावांचा समावेश आहे.


दीपिका पादुकोण


दीपिका पादुकोणला कोणत्याही परिचयाची गरज नाही, तिने इंडस्ट्रीत आपली छाप सोडली आहे आणि ती टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिका ही भारतीय बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांची मुलगी आहे.



मॉडेलिंग आणि बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी दीपिका बॅडमिंटनही खेळली होती. ती अजूनही वेळ मिळेल तेव्हा बॅडमिंटन खेळते.


सारा तेंडुलकर



सारा तेंडुलकरने नुकतेच मॉडेलिंग करिअर सुरू केले आहे आणि ती चर्चेत आहे. आता तिच्या बॉलिवूड डेब्यूच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. पण तिने अद्याप बॉलिवूड पदार्पणाची माहिती दिलेली नाही.