Sara Tendulkar : सचिन तेंडुलकरची ( Sachin Tendulkar ) मुलगी सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar ) विविध गोष्टींमुळे चर्चेत असते. कधी भाऊ अर्जुन तेंडुलकरचा ( Arjun Tendulkar ) सामना पाहण्यासाठी ती स्टेडियममध्ये उपस्थित असते, तर कधी शुभमन गिलसोबतच्या ( Shubman Gill ) कथित अफेअरमुळे तिच्या नावाची चर्चा असते. सध्या आयएपीएल सुरु असून मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians ) टीमकडून अर्जुन तेंडुलकर खेळत होता. यावेळी भावाला सपोर्ट करण्यासाठी सारा मैदानात आलेली दिसली. पण यावेळी सारासोबत सामना पाहायला आलेल्या एका मुलावर सर्वांच्या नजरा खिळल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई इंडियन्सचा  ( Mumbai Indians ) सामना पाहण्यासाठी सारासोबत आलेला हा मिस्ट्री साराचा नेमका कोण लागतो या प्रश्नाने सर्वांच्या मनात घर केलं. यावरून अनेक तर्क वितर्क देखील काढण्यात आले. मात्र आता हा मुलगा नेमका कोण हे समोर आलं आहे. 


सारा सोबत असलेला हा मिस्ट्री बॉय कोण?


साराचा भाऊ अर्जुन तेंडुलकरने ( Arjun Tendulkar ) यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या  ( Mumbai Indians ) टीमकडून डेब्यू केलं. मुंबई विरूद्ध कोलकाता या सामन्यात अर्जुनला पहिल्यांदा खेळण्याची संधी मिळाली. भावाला पहिल्या सामन्यात पाठिंबा देण्यासाठी सारा तिच्या मित्रांसोबत मैदानात उपस्थित होती. यावेळी तिच्यासोबत तिचा एक जवळचा मित्रही आला होता. या दोघांचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.  


बरेच फोटो व्हायरल झाल्यानंतर समजलं की, हा मुलगा साराचा खूप जवळचा मित्र आहे. याचं नाव सिद्धार्थ केरकर आहे. हा साराचा बेस्ट फ्रेंड असल्याचं समोर आलं होतं. याशिवाय सारा ( Sara Tendulkar ) आणि सिद्धार्थसोबत अजून एका साराच्या मैत्रिणीला देखील स्पॉट करण्यात आलं होतं. ही मुलगी साराची लहानपणीची मैत्रीण असल्याची माहिती आहे. 


शुभमन आणि साराच्या अफेअरची चर्चा


टीम इंडियाचा हँडसम हंक शुभमन गिलसोबत ( Shubman Gill ) सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar ) सोबत असल्याच्या चर्चा आहेत. शुभमनचं नाव सचिन अनेकदा सारा तेंडुलकरसोबत जोडलं जातं. सारा आणि शुभमन या दोघांचं कथित अफेअर असल्याची कथित आहे. दरम्यान अद्याप दोघांपैकी एकानेही याची अधिकृतरित्या कोणीही घोषणा केली नाही. मात्र स्टेडियममध्ये चाहते देखील साराच्या नावाने शुभमनला चिडवताना दिसतात.