मुंबई : पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला आहे. पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद सध्या यष्टीरक्षणाचा सराव करतो आहे. पण वीस मीटर अंतरावरून बॉल टोलवला जातोय आणि ते पकडण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक सरफराज करतो आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याआधी यष्टीरक्षणात कोणतीही चूक राहू नये यासाठी सरफराज मैदानात घाम गाळतोय. मात्र त्याची हीच कृती काही पाकिस्तानी फॅन्सना रुचलेली नाही. त्यामुळे समाज माध्यमात सरफराज ट्रोल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. त्यानंतर लगेचच पाकिस्तानच्या क्रिकेट फॅन्सनी सरफराजची खिल्ली उडवण्यास सुरूवात केली आहे. काही फॅन्सनी सौम्य शब्दांत तर काहींनी कठोर शब्दांत सरफराजवर टीकेची झोड उठवली आहे.



'हे तर शालेय स्तरावरील प्रशिक्षण, सरफराजला आणखी सरावाची गरज आहे, सरफराजला थोडे फार फलंदाजीचेही धडे द्या,  आजच्या यष्टीरक्षकांप्रमाणे उड्या मारून झेल पकडणं सरफराजला काही जमत नाही. त्यामुळे त्याला त्या सरावाचीही गरज आहे., 
मिकी आर्थरला माहिती आहे सरफराज उड्या मारणार नाही. त्यामुळे उड्या मारून झेल पकडण्याचा सराव दिला जात नाही.' असे ट्रोल करणार वक्तव्य सोशल मीडियावर करण्यात आले आहेत.


ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना पाकिस्तानसाठी महत्त्वाचा आहे. या सामन्यात यष्टीरक्षण महत्त्वाचं ठरू शकतं. त्यासाठीच कर्णधार सरफराज यष्टीरक्षणावर मेहनत घेतो आहे. मात्र पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना त्याच्या सरावाची पद्धत काही रुचली नाही.