Sarfaraz Khan Father : भारतीय संघ 7 मार्चपासून धरमशाला येथे इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना (IND vs ENG 5th Test) खेळणार आहे. यासाठी टीम इंडियाने हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन (HPCA) स्टेडियमवर घाम गाळला. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या उपस्थितीत खेळाडू बराच वेळ सराव करताना दिसले. यावेळी सरफराज खान आणि देवदत्त पेडिकल देखील मैदानात दिसला. अशातच आता पाचव्या टेस्टपूर्वी सरफराज खानच्या वडिलांनी एका व्हिडीओ शेअर करून (Naushad khan revealed forgery Scam) धक्कादायक बातमी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नौशाद खान हे मुंबई क्रिकेट कोचिंगमधील एक महत्त्वाचं नाव आहे. आता त्यांच्या नावाचा वापर करून मोठा घोटाळा होत असल्याचं समोर आलं आहे. नौशाद खान याचा मोठा मुलगा सरफराज सध्या टीम इंडियाकडून खेळतो. तर लहान मुलगा मुशीर देखील रणजीमध्ये धमाल गाजवताना दिसतोय. अशातच नौशाद यांनी स्वतः एक व्हिडीओ पोस्ट करून या स्कॅमबाबत गौप्यस्फोट केला.


काय म्हणाले नौशाद खान?


माझ्या नावाचा वापर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फेक आयडी बनवण्यात येत आहेत. याचा खुलासा करण्यासाठी मी आता तुमच्यासमोर आलोय. तुमच्या मुलाला आयपीएलमध्ये नेट बॉलर म्हणून संधी मिळेल, तसेच अकादमीमध्ये त्याला संधी दिली जाईल. एवढंच नाही तर राज्याच्या संधात देखील त्याला जागा देण्यात येईल, असं आश्वासन देऊन त्यांच्याकडून पैसे उकळण्यात येत आहेत. भूलथापांना बळी पडू नका. अशा गोष्टींमध्ये अडकू नका. तुम्ही फक्त मेहनतीवर लक्ष द्या, मी कोणत्याही आयपीएल संघासोबत जोडलो गेलो नाही. त्यामुळे तुम्ही कोणत्याही अमिषाला बळी पडू नका, असं नौशाद खान यांनी म्हटलं आहे.



दरम्यान, राजकोट टेस्टमध्ये सरफराज खानचा डेब्यू झाला होता. अनिल कुंबळे यांच्या हातून सरफराजला टीम इंडियाची कॅप मिळाली होती. त्यावेळी सरफराजचे वडील नौशाद खान देखील उपस्थित होते. लेकाला टीम इंडियाची कॅप मिळताना पाहून नौशाद खान यांच्या डोळ्यात अश्रू पहायला मिळाले होते.