राजकोट : रवींद्र जडेजाच्या दमदार खेळाने आणि वंदित जीवराजानीच्या शानदार बॉलिंगमुळे सौराष्ट्रने रणजी ट्रॉफी ग्रुप बी सामन्यात तिस-या दिवशी जम्मू-काश्मीरला मात दिली. सौराष्ट्रने जम्मू-काश्मीरला २१२ रन्सने मात दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सौराष्ट्रने रविंद्र जडेजाच्या २०१ रन्सच्या मदतीने आपली पहिली खेळी सात विकेटवर ६२४ रन्स करून घोषित केली. त्यानंतर जम्मू-काश्मीरला सोमवारी सकाळी पहिल्या पारीत १५६ रन्सवर बाद केले. रविंद्र जडेजाने ४० रन्स देऊन चार आणि धर्मेंद्रसिंह जडेजाने ६८ रन्स देऊन सहा विकेट घेतल्या. 


सौराष्ट्रचा कर्णधार चेतेश्वर पुजाराने जम्मू-काश्मीरला फॉलोऑनसाठी आमंत्रित केलं. जम्मू-काश्मीरचे बॅट्समन दुस-या इनिंगमध्ये काही खास प्रदर्शन करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांची टीम २५६ रन्सवर आऊट झाली. रविंद्र जडेजाने ६९ रन्स देऊन तीन आणि जीवराजानीने ७९ रन्स देऊन सहा विकेट घेतल्या. जम्मू-काश्मीरकडून पुनीत बिष्ट(५५) आणि रामदयाल(५६)ने अर्धशतक केले. 


सौराष्ट्रने आपल्या पहिल्या मॅचमध्ये हरियाणाला मात दिली होती. आता त्यांचे दोन सामन्यांमुळे १४ अंक झाले आहेत. याआधी रविंद्र जडेजाने २३ फोन आणि दोन सिक्सर लगावत २०१ रन्स केले. शनिवारी शेल्डन जॅकसन(१८१)सोबत चौथ्या विकेटसाठी २८१ रन्सची भागीदारी केली. विकेटकीपर स्नेल पटेलने(९४) केले.