Saurashtra Wins Ranji Trophy :रणजी ट्रॉफीची फायनल (Ranji Trophy 2023) बंगाल आणि सौराष्ट्र यांच्यात ईडन गार्डवर पार पडला. या फायनलच्या (Ranji Trophy Final) सामन्यात सौराष्ट्राने बंगालचा 9 विकेट्सनी पराभव केला आहे. सौराष्ट्रच्या (Saurashtra) भेदक गोलंदाजीच्या जोरावर सौराष्ट्रने रणजीची ट्रॉफी (Saurashtra Wins Ranji Trophy) उचलली आहे. सौराष्ट्राचा संघ गेल्या तीन हंगामात दुसऱ्यांदा चॅम्पियन बनला आहे. (saurashtra wins ranji trophy 2023 bets bengal by nine wickets in final latest marathi news)


Jaydev Unadkat ची भेदक गोलंदाजी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सौराष्ट्रने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेतन साकरिया (Chetan Sakaria) आणि जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) या स्टार गोलंदांनी बंगालच्या फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या. सौराष्ट्राने पहिल्या डावात 404 धावांची मजल मारली होती. डोंगराऐवढ्या धावसंख्येचा दबाव बंगालवर दिसून आला. बंगालचा संघ दुसऱ्या सामन्यात केवळ 241 धावा करू शकला. उनाडकटने दुसऱ्या डावात 85 धावांत 6 विकेट घेतल्याने बंगालच्या संघाला सावरण्याचा वेळ मिळाला नाही.


आणखी वाचा - IND vs AUS : Virat Kohli नव्या युगाचा चॅम्पियन; अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज, सचिनही फिका


दुसऱ्या डावात सौराष्ट्रासमोर फक्त 12 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. उनाडकटच्या संघाने एक विकेट गमावून पूर्ण केलं आणि रणजीची ट्रॉफी उचावली. सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनाडकटने सामन्यात 9 बळी घेत आपल्या संघाला चॅम्पियन (Ranji Trophy Final) बनवलं. त्यामुळे त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आलं. पहिल्यांदाच नाही तर जयदेव उनाडकटने सौराष्ट्रला दुसऱ्यांदा चॅम्पियन बनवलं आहे.


पाहा Video 



दरम्यान, सौराष्ट्रकडून जयदेव उनाडकट आणि चेतन साकारिया यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतले. चिराज जानी आणि डी जडेजा यांना प्रत्येकी 2 विकेट घेतले. त्यामुळे बंगालच्या संघाला मैदानात टिकता आलं नाही.


पाहा स्कोरकार्ड - 


बंगाल (पहिला डाव) : 54.1 ओव्हर सर्वबाद 174
सौराष्ट्र (पहिला डाव) : 110 ओव्हर सर्वबाद 404
बंगाल (दुसरा डाव): 70.4 ओव्हर सर्वबाद 241
सौराष्ट्र (दुसरा डाव): 2.4 ओव्हर 1 विकेट 14