मुंबई : जगातील सर्वोत्तम क्रिकेटर्समध्ये विराट कोहलीचं नाव घेतलं जातं. अनेक दिग्गज खेळाडूंनी त्यांच्या ऑल टाईम प्लेईंग 11 मध्ये विराट कोहलीचा समावेश केला आहे. मात्र बीसीसीआयचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुली हे यासाठी अपवाद ठरले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतंच बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी त्यांचं सर्वोत्तम प्लेईंग 11 निवडलं आहे. मुख्य म्हणजे यामध्ये, सौरव गांगुली यांनी विराट कोहलीचा समावेश केला नाहीये. दरम्यान यामागे विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यात झालेल्या वादाचे परिणाम असल्याचा अर्थ काढण्यात आला आहे.


ओपनरमध्ये गांगुली यांनी दोन डावखुऱ्या फलंदाजांचा समावेश केला आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन आणि इंग्लंडचा अॅलिस्टर कुक यांना गांगुलीने पसंती दिली आहे. त्याच्यानंतर गांगुली यांनी राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर या दोन मोठ्या भारतीय फलंदाजांची निवड केली.


ऑलराऊंडरसाठी दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज जॅक कॅलिसची निवड केली आणि विकेटकीपर म्हणून श्रीलंकेचा फलंदाज कुमार संगकाराकडे याच्या नावाचा समावेश केला आहे.


आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गांगुलीने रिकी पाँटिंगला 7 व्या क्रमांकावर ठेवलंय आणि त्याची कर्णधारपदी देखील निवड करण्यात आली होती. ग्लेन मॅकग्रा, डेल स्टेन, शेन वॉर्न आणि मुथय्या मुरलीधरन यांच्यासह काही दिग्गज गोलंदाजांना निवडून त्याने आपली प्लेइंग इलेव्हन पूर्ण केली आहे.


सौरव गांगुली यांची ऑल टाईम इलेवन


मॅथ्यू हेडन, एलिस्टर कूक, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, जॅक्स कॅलिस, कुमार संगकारा, रिकी पॉटिंग (कर्णधार), ग्लेन मॅकग्रा, डेल स्टेन, शेन वार्न, मुथैया मुरलीधरन