Rohit Sharma In School Syllabus : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) धुरळा उडवत असल्याचं पहायला मिळतंय. कॅप्टन रोहितने वर्ल्ड कपमध्ये संघाला धमाकेदार अंदाजात सुरूवात करून देतोय. टार्गेट असो वा नसो, पावरप्लेमध्ये दमदार सुरूवात करून देयची अन् बाकी खेळाडूंच्या डोक्यावरचं प्रेशर कमी करायचा या गेम प्लॅनसह रोहितने वर्ल्ड कप गाजवलाय. त्यामुळे आता रोहितच्या सेल्फलेस क्रिकेटचं कौतूक होताना दिसतंय. अशातच आता शाळेच्या पाठ्यपुस्तकात (Rohit Sharma In School Syllabus) देखील रोहित शर्माचा धडा सामील करण्यात आला आहे. रोहित शर्माचा क्रिकेटपटू होण्यापर्यंतचा प्रवास या धड्यात सांगण्यात आलायय त्यामुळे लहान मुलांना देखील या 35 वर्षाच्या तरुण खेळाडूची ओळख होणार आहे.


पाहा पाठ्यपुस्तकातील धडा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्मा हा भारताने निर्माण केलेल्या सर्वात प्रतिभावान युवा फलंदाजांपैकी एक आहे. रोहित शर्माचा जन्म 30 एप्रिल 1987 रोजी बनसोड, महाराष्ट्रातील नागपूर येथे झाला. रोहित शर्माला फलंदाज बनायचं नव्हतं. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात ऑफ-स्पिनर म्हणून केली. पण त्याचे प्रशिक्षक दिनेश लाड यांना रोहितची बॅटमधील क्षमता लक्षात आली आणि त्याला बॅट्समनमध्ये रूपांतरित केलं. 


रोहित शर्माचे पालक त्याच्या शाळेची फी भरू शकत नव्हते. त्यामुळे, त्याच्या क्रिकेट क्षमतेमुळे त्याला त्याच्या शाळेत शिष्यवृत्ती देण्यात आली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी 50 पेक्षा जास्त आहे आणि त्याने भारतीय क्रिकेट संघात पदार्पण करण्यापूर्वी विविध सामन्यांमध्ये नाबाद तिहेरी धावा केल्या आहेत.


2013 मध्ये ईडन गार्डन्सवरील पहिल्या कसोटीत त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केलं. त्याने आपल्या पदार्पणाच्या डावात 177 धावांची धडाकेबाज खेळी केली आणि भारताला एका अनिश्चित परिस्थितीतून बाहेर काढलं. सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेच्या 2006-07 च्या गुजरातविरुद्ध मुंबईसाठी एक धावा करताना रोहित शर्मा टी-20 मध्ये शतक करणारा पहिला भारतीय होता. रोहितने 45 चेंडूत 13 चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 101 धावा केल्या होत्या.


ईडन गार्डन्सवरील चौथ्या एकदिवसीय सामन्यात, रोहित शर्माने श्रीलंकेच्या गोलंदाजांना धु धु धुतलं अन् सनसनाटी 173 चेंडूत 264 धावांची खेळी केली. एकदिवसीय क्रिकेटमधील आतापर्यंतची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या उभी केली. 



दरम्यान, रोहित शर्मा वर्ल्ड कपमध्ये निवडलेल्या संघावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. मात्र, रोहितने खेळाडूंवर विश्वास दाखवला अन् वर्ल्ड कपच्या फायनलपर्यंतचा प्रवास पूर्ण केलाय. रोहित शर्मा यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये असा कॅप्टन ठरतोय, जो स्वत: जबाबदारी घेऊन संघाची गाडी खेचत आहे. रोहितच्या या अद्वितिय कामगिरीमुळे आता टीम इंडिया वर्ल्ड कपपासून एक पाऊल लांब आहे. त्यामुळे आता रोहित शर्मा वर्ल्ड कप विजेता कॅप्टन होणार का? असा सवाल विचारला जात आहे.