WI vs IND : भारत विरूद्ध वेस्ट इंडिज ( WI vs IND 1st Test ) यांच्यात सामना पहिली टेस्ट मॅच सुरु असून या सामन्यावर टीम इंडियाची ( Team India ) चांगली पकड दिसून येतंय. या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनंतर फलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. ओपनिंगला आलेला आणि डेब्यू केलेल्या यशस्वी जयस्वालने ( Yashasvi Jaiswal ) उत्तम शतक ठोकलं असून तो नाबाद आहे. जयस्वालसोबत कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) देखील शतकी कामगिरी केलीये. मात्र वेस्ट इंडिज विरूद्ध शतक ठोकल्यानंतर देखीस सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात आलंय. 


वेस्ट इंडिजने जिंकला टॉस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी सुरु झालेल्या या टेस्ट सामन्यामध्ये वेस्ट इंडिजच्या टीमने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय टीम इंडियाच्या गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरला. यावेळी वेस्ट इंडिजची टीम अवघ्या 150 रन्सवर गारद झाली. 


रोहितने झळकावलं शतक 


वेस्ट इंडिज विरूद्ध भारत ( WI vs IND 1st Test ) यांच्यातील पहिल्या टेस्टमध्ये कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) शतक झळकावलंय. हा त्याच्या टेस्ट कारकिर्दीतील हे 10 वं शतकं होतं. रोहित शर्माने 221 बॉल्समध्ये 10 फोर आणि 2 सिक्सेसच्या मदतीने 103 रन्स केले. दरम्यान शतक झळकावल्यानंतरही चाहत्यांनी त्याला ट्रोल केलंय.









रोहित शर्माने रचला इतिहास


वेस्ट इंडिजविरुद्ध डॉमेनिकामध्ये खेळल्या जात असलेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात शतक झळकावून रोहित शर्माने स्टीव्ह स्मिथच्या रेकॉर्डची बरोबरी केलीये. टीम इंडियाचा कर्णधार 'हिटमॅन' रोहित शर्माने ( Rohit Sharma ) आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 44 शतके पूर्ण केलीयेत. ही कामगिरी करत त्याने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 44 शतकांचा विक्रम मोडलाय. 


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणारा एक्टिव्ह फलंदाज


विराट कोहली (भारत) - 75 शतकं
जो रूट (इंग्लंड) - 46 शतकं
डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) - 45 शतकं
स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) - 44 शतकं
रोहित शर्मा (भारत) - 44 शतकं