मुंबई : राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यंदाच्या हंगामात चांगलाच फॉर्ममध्ये आहे. बॅटींग आणि बॉलिंग या दोघांच्या माध्यमातून तो सध्या आयपीएलमध्ये टीमसाठी स्वत:च योगदान देतोय. नुकतीच त्याची एक मुलाखत शेअर केली आहे. या मुलाखतीत त्याने त्याचे अनेक अनुभव शेअर केले आहेत. आयपीएलमधला आणि टीम इंडियात खेळतानाचा त्याचा अनुभव त्याने शेअर केला आहे. या मुलाखतीची खुप चर्चा रंगली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मुलाखतीत रविचंद्रन अश्विन म्हणाला की, एक क्रिकेटर म्हणून माझ्यासाठी ही सर्वोत्तम आयपीएल होती. माझ्या कामगिरीशी किंवा संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्याशी त्याचा काहीही संबंध नाही. ही माझ्यासाठी वेग-वेगळे प्रयोग करण्याची संधी आहे. त्यामुळे हा माझ्यासाठी सर्वोत्तम क्षण आहे.मात्र जेव्हा मी खेळात प्रयोग करू शकत नाही, तेव्हा कदाचित मी खेळ सोडेन,असेही तो या मुलाखतीत म्हणताना दिसतोय.  


महेंद्रसिहं धोनीबद्दल काय म्हणाला ? 


खालच्या फळीत फलंदाजी करणे खूप अवघड असते. मी महेंद्रसिंग धोनीला अनेकदा खालच्या फळीत खेळताना पाहिले आहे. यावेळी धोनीसाठी प्रत्येकवेळी माझ्या तोंडून वॉवचं निघते.  तो एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करतो, खेळ शेवटपर्यंत नेतो आणि सामना जिंकवतो. अनेक खेळाडूंनी त्याच्याकडून ही गोष्ट शिकण्यासारखी आहे.  


अश्विन पुढे म्हणतो की,  दुसरा महेंद्रसिंग धोनी कधीच होऊच शकत नाही, दुसरा सचिन तेंडुलकर कधीच होऊच शकत नाही, असे देखील त्याने म्हटले आहे. त्याच्या या विधानाची चर्चा रंगलीय. 


डंकन फ्लेचरचा तो किस्सा 
रविचंद्रन अश्विनने एकदा आपला खेळ कसा सुधारावा असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांनी मला सांगितले की, जर मी जास्त चुका केल्या तरच मी चांगले होईल. जर तुम्ही लोकांसमोर अपयशी ठरलात तरच तुम्ही स्वतःला सुधारू शकाल. 


आयपीएलमधली कामगिरी 
अश्विनने या मोसमात 14 सामन्यात 183 धावा केल्या आहेत ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. तर त्याने 11 विकेट्सही घेतल्या आहेत.